"मी तुमच्यापेक्षा वेगवान आहे..." मिशेल स्टार्कने हर्षित राणाला दिली 'धमकी', बघा Viral Video

Harshit Rana and Mitchell Starc Viral Video: भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 23, 2024, 12:34 PM IST
"मी तुमच्यापेक्षा वेगवान आहे..."  मिशेल स्टार्कने हर्षित राणाला दिली 'धमकी', बघा Viral Video title=
Photo Credit: X

Mitchell Starc vs Harshit Rana Viral Moment IND vs AUS:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया 150 धावांवर ऑलआऊट झाली होती. यानंतर कांगारू संघाला 104 धावांपर्यंत मजल मारता आली. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात दोन्ही संघांचे खेळाडू भिडले. टीम इंडियाचा गोलंदाज हर्षित राणा आणि ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्यात बाचाबाची झाली.

स्टार्क आणि हर्षित यांच्यात झाला वाद 

 

स्टार्क आणि राणा हे कोलकाता नाइट रायडर्स (KKR) मध्ये एकमेकांचे सहकारी होते. सुरु असलेल्या सामान्य दरम्यान दोघेही मैदानाच्या मधोमध बोलतांना दिसले. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 30व्या षटकात हर्षित राणाने बाऊन्सरने स्टार्कला वाकण्यास भाग पाडले. त्याने शॉर्ट बॉल टाकले. डावखुरा फलंदाज स्टार्क बुलेटच्या वेगाने येत असलेल्या चेंडूंमुळे त्रस्त झाला. मग स्टार्कने हर्षितला आठवण करून दिली की या दोघांमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोण आहे. 

हे ही वाचा: W,W,W,W,W... जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत रचला इतिहास! नावावर केले 5 मोठे जागतिक विक्रम

 

हर्षितला काय म्हणाला स्टार्क?

 

हर्षित राणा बॉलिंग क्रिझवर परतत असताना स्टार्क म्हणाला, "हर्षित, मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करतो. मी तुझ्यापेक्षा वेगवान आहे."  स्टार्क इथेच थांबला नाही आणि त्याने हर्षित राणाला सुचवले की, जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा त्याच्याकडून अतिशय वेगवान आणि लहान गोलंदाजीची अपेक्षा करावी. स्टार्क म्हणाला, "माझी खूप चांगली मेमरी आहे." यावर हर्षित राणाने फक्त छान हसले. अशाप्रकारे  स्टार्क आणि हर्षित यांच्यात मैत्रीपूर्ण वाद झाला. 

हे ही वाचा: 2 खेळाडूंवर बंदी, 3 जणांवर टाकती तलवार; IPL 2025 च्या लिलावापूर्वी BCCI ची मोठी कारवाई

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

 

हे ही वाचा: Video: ऋषभ पंतचा 'हवाई हल्ला'! खेळपट्टीवर पडून मारला अप्रतिम षटकार, ऑस्ट्रेलिया पाहतच राहिला

 

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

 

नवोदित नितीश रेड्डीच्या धाडसी 41 धावा आणि ऋषभ पंतच्या 37 धावांच्या जोरावर भारताने 49.4 षटकांत 150 धावांपर्यंत मजल मारली. जोश हेझलवूड (29 धावांत 4 विकेट), मिचेल स्टार्क (11 षटकांत 14 धावांत 2 बळी), पॅट कमिन्स (15.4 षटकांत 67 धावांत 2 बळी) आणि मिचेल मार्श (5 षटकांत 12 धावांत 2 विकेट) यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली साथ दिली. साठी तुफानी गोलंदाजी केली.यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर नेमके तेच केले. बुमराह, हर्षित आणि सिराज यांनी मिळून कांगारू संघाला 104 धावांपर्यंत मजल मारली. त्यासाठी स्टार्कने सर्वाधिक २६ आणि ॲलेक्स कॅरीने २१ धावा केल्या. सध्या टीम इंडियाला 118 धावांची आघाडी मिळाली आहे.