IND vs AUS: दिल्लीचेही तख्त राखतो 'सर जड्डू' आमचा; एकटाच पूरून उरला.. मालिकेत 2-0 ने आघाडी

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेटने विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे,

Updated: Feb 19, 2023, 03:48 PM IST
IND vs AUS: दिल्लीचेही तख्त राखतो 'सर जड्डू' आमचा; एकटाच पूरून उरला.. मालिकेत 2-0 ने आघाडी title=
IND vs AUS 2nd Test

IND vs AUS 2nd Test Live: भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs australia) यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात (IND vs AUS) टीम इंडियाने 6 विकेटने विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे, त्यामुळे आता टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) मार्ग मोकळा होताना दिसतोय. टीम इंडियाने अडीच दिवसात कांगारूंचा खेळ खल्लास केलाय.

IND vs AUS: तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलिया वर टीम इंडियाचा दणदणीत विजय..

भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus 2nd test) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी हाफ सेंच्यूरी झळकावली. तर टीम इंडियाच्या वतीने शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.

आणखी वाचा - Chole Bhature: भडकलेला Virat का झाला एवढा खुश? जेव्हा Anushka ही संतापली होती! Video Viral..

अश्विन-जडेजाची दमदार गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 264 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 262 वर आटोपला गेला. विराट कोहलीने  44 धावा केल्या तर  अक्षर पटेलने  74 धावा करत भारताला सावरलं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 1 रनची लीड घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात रविंद्र जडेजा आणि आश्विने सटीक मारा करत 10 विकेट काढल्या. त्यात जडेजाच्या 7 तर आश्विनच्या 3 होत्या.

Border gavaskar मालिकेत 2-0 ने आघाडी 

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 113 डावांवर गुंडाळल्यानंतर आता भारताचा विजयासाठी  115 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 1 रनची लीड घेतली होती. त्यानंतर आता भारत हा सामना जिंकेल, अशी अपेक्षा असताना टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला आहे.