GT vs RCB, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोघं संघात सामना खेळला गेला, तर या सामन्यात आरसीबीच्या संघाने, गुजरातवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. पण या सामन्यात असे काही घडले ज्यामुळे हा सामना लोकांच्या चर्चेत आला आहे. प्रथम गोलंदाजी करत असताना बंगळुरूने, गुजरातच्या संघाला 147 धावांवर रोखले होते. बंगळुरूच्या गोलंदाजीमध्ये सिराज, यश दयाल आणि विजयकुमार यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत, तर ग्रीन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आरसीबीने फक्त 14 ओव्हरमध्येच या लक्षाला चेस केले आणि हा सामना आपल्या खिशात टाकून 2 पॉइंट्स नावावर केले. पण चर्चा झाली ती मोहम्मद सिराजची...!
आजारी असून आपल्या घातक गोलंदाजीने जिंकवली मॅच
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराज याने गुजरात टायटन्सविरूद्ध उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स घेत, सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होण्याचाही मान मिळवला होता. पण इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सिराज असे काही बोलला ज्यामुळे साऱ्या क्रिकेट फॅन्स थक्क झाले आहेत. मोहम्मद सिराज मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतल्यानंतर बोलला की, 'मी गेल्या काही दिवसांपासून आजारी होतो. यामुळे मला आज वाटत होते की, मी आजचा सामना नाही खेळू शकणार, पण मी आजचा सामना खेळू शकलो यामुळे मी खूप खुश आहे. मोहम्मद सिराज याने गोलंदाजीत दोन विकेट्स घेतल्या, वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या दोघं महत्वाच्या विकेट्स घेत गुजरात टायटन्सचे कंबर मोडलं होतं.
सिराज म्हणतो...
सामना झाल्यानंतर सिराज म्हणाला, 'मला आमच्या संघाचा कॅप्टन फाफ डू प्लेसीने आराम करायला सांगितलं होतं, पण मी यावर विचार केला आणि ठरवलं की, आजचा सामना मी खेळला पाहिजे. नंतर फाफ मला बोलला की, आजच्या सामन्याची पिच ही खूप महत्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे आणि गुजरात टायटन्सचा संघ जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावणार'. यामुळे मी आजचा सामना खेळलो आणि चांगले प्रदर्शन करून आरसीबाला सामना जिंकवून दिला या गोष्टीमुळे मी अत्यंत खूश आहे.'
आरसीबी प्लेऑफ गाठणार तरी कसं?
मागील तीन सामन्यात जशी अफलातून कामगिरी आरसीबी करतीये, तशीच कामगिरी त्यांना आगामी तीन सामन्यात करावी लागणार आहे. त्यांना अजून तीन सामने खेळायचे आहेत. बंगळुरूचे आगामी सामने पंजाब, दिल्ली आणि चेन्नईविरुद्ध आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक सामना हा करो या मरो असाच असेल. फक्त तीन सामने जिंकून आरसीबीला प्लेऑफ गाठता येणार नाही. आरसीबीला प्लेऑफमध्ये जायचं असेल तर लखनऊ किंवा हैदराबादला उर्वरित सामने हरावे लागतील. तसेच चेन्नई आणि दिल्ली 4 पैकी 3 सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागणार आहे.