वेगाचा बादशाह; उमरान मलिकसाठी आईने दिला स्पेशल मेसेज

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आहे.

Updated: Oct 7, 2021, 03:31 PM IST
वेगाचा बादशाह; उमरान मलिकसाठी आईने दिला स्पेशल मेसेज title=

दुबई : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंघलूरू (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यात उमरानने 152.95 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. आयपीएल 2021 चा हा सर्वात वेगवान बॉल होता. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने 152.75 च्या वेगाने एक चेंडू टाकला होता.

भारतासाठी उमरानने खेळलं पाहिजे

उमरानची आई सीमा मलिक सांगतात, 'मुलाला टीव्हीवर पाहून माझे अश्रू अनावर झालेत. त्याचप्रमाणे इतक्या दूर गेल्याचं मला दुःख देखील आहे. आम्ही त्याच्यासाठी खूप आनंदी आहोत. मला एकच मुलगा आहे, ज्यांच्यासाठी मी खूप प्रार्थना करते. माझा मुलगा पुढे गेला पाहिजे आणि भारताकडून खेळला पाहिज. हे माझे स्वप्न आहे.'

सीमा पुढे म्हणाल्या, 'उमरानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. जेव्हा उमरान 3-4 वर्षांचा होता, तेव्हा तो मला बॉलिंग टाक मी बॅटींग करेन असं म्हणायचा. मोठा झाल्यावर शाळेतून यायचा, तेव्हा तो थेट खेळायला जायचा. नंतर त्याने क्रिकेटला आपलं करियर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही त्याला खूप पाठिंबा दिला."

भारताला मिळाला सर्वात वेगवाग गोलंदाज

जम्मूच्या या मुलाने दाखवलेला वेगाने सोशल मीडियावर सर्वांची मन जिंकली. आरसीबीच्या डावात 9व्या ओव्हरमध्ये, मलिकने 150 kmph किंवा त्याहून अधिक वेगाने सलग पाच बॉल टाकले. या दरम्यान, मलिकने या चौथा बॉल 153 kmph वेगाने टाकून सोशल मीडियावर बरीच वाहवा मिळाली.