पाकिस्तानच्या टीममध्ये आधीच अडचणी बऱ्याच अडचणी; माजी खेळाडूचं वक्तव्य!

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा पूर्व ऑलराऊंडर अब्दुल रझ्झाकने भारतीय खेळाडूंसंदर्भात एक मोठं विधान केलं होतं.

Updated: Oct 7, 2021, 02:57 PM IST
पाकिस्तानच्या टीममध्ये आधीच अडचणी बऱ्याच अडचणी; माजी खेळाडूचं वक्तव्य! title=

दिल्ली : टी-20 वर्ल्ड कप सुरु होण्यासाठी काही दिवसंच बाकी आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा पूर्व ऑलराऊंडर अब्दुल रझ्झाकने भारतीय खेळाडूंसंदर्भात एक मोठं विधान केलं होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, जर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली सामन्यात लवकर बाद झाले तर पाकिस्तान भारताला सहज हरवेल. तर यावरून पाकिस्तानचा माजी लेग स्पिनरने चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय टीम पाकिस्तानपेक्षा खूप पुढे

पूर्व पाकिस्तानी लेग स्पिनर दानिश कन्हेरियाने  अब्दुल रझ्झाकच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. कन्हेरिया याच्या म्हणण्याप्रमाणे रझ्झाकने दोन्ही टीमची तुलना करू नये. भारतीय टीम पाकिस्तानच्या टीमपेक्षा खूप पुढे आहे. 

पाकिस्तानच्या टीममध्ये आधीच अडचणी

कनेरियाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, पाकिस्तान टीमने आधी स्वतःचा संघातील अडचणी दूर कराव्या. खुद्द पाकिस्तान संघातच अनेक समस्या आहेत. तुमची फलंदाजी कुठे आहे? सामना कोण जिंकवून देईल तुम्हाला? इंग्लंडच्या B संघाने पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. आणि त्यानंतर तुम्ही भारताला पराभूत कराल अशी चर्चा आहे. अब्दुल रज्जाक यांनी अशी विधानं करू नयेत.

भारताकडे अधिक चांगले खेळाडू

अब्दुल रज्जाक यांच्यावर टीका करताना कनेरिया म्हणाला की, पाकिस्तानची भारताशी मुळीच तुलना करू नका. भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. भारताकडे ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतसारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत. या खेळाडूंना बाद करणं इतके सोपं नाही.