IND vs SA | विराट कोहलीचं 3 वर्षात दुसऱ्यांदा अपयशी, 'रनमशीन'चं स्वप्न अधुरंच

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs Sa 3rd Test) टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह आफ्रिकेने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे.  

Updated: Jan 14, 2022, 06:20 PM IST
IND vs SA | विराट कोहलीचं 3 वर्षात दुसऱ्यांदा अपयशी, 'रनमशीन'चं स्वप्न अधुरंच

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs Sa 3rd Test) टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह आफ्रिकेने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. यासह टीम इंडियाचं आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून धडाक्यात सुरुवात केली होती. (ind vs sa 3rd test day 4 team india lost test series against south africa in 3 years 2 time under virat kohli captaincy)

मात्र यानंतर विराटसेनेला जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासह विराट कोहलीला (Virat Kohli) ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याची असलेली संधीही हुकली. विराटने जर मालिका विजय मिळवून दिला असता, तर तो आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकून देणारा पहिला कर्णधार ठरला असता.

सोबतच विराटकडे एका वर्षात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर  दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा कारनामा करण्याची संधीही होती. टीम इंडिया इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकल्याचं जवळपास निश्चित आहे.  

इतकंच नाही, विराटला सेना देशात (Sena Country) (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या दौघांपैकी पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी होती. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला होता. 

टीम इंडियाने 2018-19 मध्ये हा कारनामा केला होता. यानंतर 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीत कांगारुंना पराभूत करत सीरिज जिंकली होती. आयर्लंड आणि अफगाणिस्तानचा अपवाद वगळता कसोटी मालिका खेळवण्यात येणाऱ्या देशांपैकी आफ्रिका एकमेव असा देश आहे, जिथे आतापर्यंत टीम इंडियाला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 

विराटच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा पराभव
 
विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेत मालिका पराभवाची ही दुसरी वेळ ठरली. याआधी टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात 2018-19 मध्ये आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. तेव्हाही टीम इंडियाला 2-1 च्या फरकाने मालिका पराभव स्वीकारावा लागला होता. 

मात्र विराट आपल्या नेतृत्वात 2 कसोटी सामन्यात विजय मिळवून देणारा पहिलावहिला कर्णधार आहे. मात्र त्याला मालिका विजय मिळवून देण्यात त्याला यश आले नाही. टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील सेंच्युरियनमधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. विशेष म्हणजे टीम इंडियाने आफ्रिकेतील पहिला कसोटी विजयाची नोंदही सेंचुरियनमध्येच केली होती. 

मात्र जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराटला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं होतं. त्यामुळे उपकर्णधार असलेला केएल राहुलने या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. पण दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर आता केपटाऊमधील तिसऱ्या सामन्यातही पराभव झाला.