मुंबई : दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईची कामगिरी शानदार झाली आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारी चेन्नईची टीम दुसरी आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरीही यावर्षी उत्तम झाली आहे. त्यामुळे धोनीचा करिश्मा अजूनही कायम आहे असंच म्हणावं लागेल. ३६ व्या वर्षीही धोनी युवकासारखीच कामगिरी करतोय. म्हणूनच धोनीचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर परदेशातही दिसून येतात. यंदाच्या संपूर्ण मोसमातच धोनीला सपोर्ट करणारे फॅन अतरंगी शक्कल लढवत आहेत. सगळ्याच स्टेडियमध्ये वेगवेगळ्या प्रकारे धोनीचे चाहते त्याचं स्वागत करताना दिसत आहेत. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात असाच एक फॅन आगळवेगळं पोस्टर घेऊन आला होता.
धोनीला पाहण्यासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडसोबतची डेट मिस करत आहे, असा बॅनर घेऊन एक चाहता दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये आला होता. चेन्नईच्या टीमनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर केला आहे.
महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात मागच्या आठही मोसमामध्ये चेन्नई सेमी फायनल किंवा प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. सगळ्या मोसमात प्ले ऑफ किंवा सेमी फायनल गाठणारी चेन्नई ही एकमेव टीम आहे. चेन्नईला आत्तापर्यंत दोनवेळा आयपीएल जिंकण्यात यश आलं आहे.
Whattey! Hope your date doesn't spot you on the TV tonight...or perhaps this tweet! #whistlepodu #yellove #DDvCSK pic.twitter.com/GzViUPn7wz
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 18, 2018