कॅप्टन कूल धोनीने आपल्या पोनी घोड्यासोबत लावली रेस, कोण जिंकलं पाहा व्हिडीओ

धोनी विरुद्ध पोनी...रेसिंगच्या मैदानात कुणी मारली बाजी, व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा!

Updated: Jun 13, 2021, 09:20 AM IST
कॅप्टन कूल धोनीने आपल्या पोनी घोड्यासोबत लावली रेस, कोण जिंकलं पाहा व्हिडीओ

मुंबई: आयपीएल स्थगित झाल्यानंतर कॅप्टन कूल धोनी आपल्या कुटुंबासोबत रांचीमधील घरी वेळ घालवत आहे. यावेळी त्याच्या घरी दोन नवीन पाहुणे आले आहेत. चेतक नावाचा घोडा आणि दुसरा पोनी नावाचा विदेशातून मागवलेल्या घोड्यासोबत धोनी खेळताना दिसत आहे. धोनीकडे श्वान देखील आहेत. त्यांच्यासोबत खेळतानाचे अनेक व्हिडीओ साक्षी धोनीने सोशल मीडियावर शेअर केले. 

कॅप्टन कूल धोनी क्रिकेटच्य़ा मैदानात सर्वश्रेष्ठ आहे. त्याने घराजवळच्या मैदानात आपल्या पोनी घोड्यासोबत रेस लावली आहे. या दोघांच्या रेसचा व्हिडीओ साक्षीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. पोनीने याआधी श्वानांसोबत रेस लावली होती. आता त्याने खेळताना धोनीसोबत रेस लावली असून त्याला पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

पोनी सध्या 2 वर्षांचा आहे. जगातील सर्वात छोट्या जातीचा घोडा खास धोनीने स्कॉटलंड वरून मागवला आहे. स्कॉटलँडहून आयात झालेल्या या घोड्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांच्या घरात आहे. या घोड्याची उंची केवळ 3 फुटापर्यंतच वाढू शकते.

 हा घोडा वेगासाठी नाही तर त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी धोनीची मुलगी जीवा हिचा या घोड्याबरोबरचा फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोलाही चाहत्यांची खूप पसंती दिली. हा घोडा खास जीवासाठी गिफ्ट करण्यात आला आहे.