मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला कधी विकेटकिपींग करताना पाहिलं आहे का? दोन मिनिटं असं वाटेल प्रश्न चुकलाय का? पण नाही विराट कोहलीने विकेटकिपिंग केलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार जरी कोहोली असला तरी बऱ्याचदा महेंद्रसिंह धोनी त्याला मार्गदर्शन करायचा. इतकच नाही तर विराट कोहलीनेही अनेकवेळा मैदानात धोनीची मदत केली आहे.
चालू सामन्या दरम्यान एकदा महेंद्रसिंह धोनीने विराट कोहलीला विकेटकिपिंगसाठी उभं केलं होतं. हा किस्सा विराट कोहलीनं शेअर केला होता. 2015मध्ये बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहलीने काही वेळासाठी महेंद्रसिंह धोनीच्या जागी विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळीचा अनुभव कोहलीने शेअर केला आहे.
2015मध्ये बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून उमेश यादव गोलंदाजीसाठी उतरला होता. त्याची बॉलिंग पाहून विराट कोहलीला आपल्या चेहऱ्यावर बॉल लागण्याची भीती खूप वाटत होती.
त्यावेळी माझ्या एक गोष्ट विशेष लक्षात आली महेंद्रसिंह धोनी मैदानात खूप जास्त सक्रिय असतो. त्याला प्रत्येक बॉलवर लक्ष द्यावं लागायचं. मैदानात काय घडतंय याच्याकडेही त्याचं विशेष लक्ष असायचं. मैदानातील प्रत्येक घडामोड धोनी बारकाईनं पाहात असे असंही यावेळी विराट कोहलीने सांगितलं.
महेंद्रसिंह धोनीने आपल्या करियरमध्ये उत्तम विकेटकीपर म्हणून आणि एक उत्तम कर्णधार म्हणून ओळखला जातो. या दोन्हीमुळे त्याच्या फलंदाजीवर कोणताच परिणाम झाला नाही. आपली भूमिका त्याने कायमच उत्तम निभावली.