MS Dhoni: "...तर मग इलेक्ट्रिक गाड्यांचा काही फायदा नाही", धोनीचं म्हणणं तुम्हालाही पटेल, पाहा VIDEO

MS Dhoni on Electric Vehicle: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) गाड्यांचं किती वेड हे तर आता सर्वज्ञात आहे. दरम्यान नुकतंच धोनीने विद्युत वाहनांसंबंधी (Electic Vehicles) भाष्य केलं आहे. धोनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यावर बोलताना चिंता व्यक्त केली आहे.   

Updated: Mar 17, 2023, 06:50 PM IST
MS Dhoni:  "...तर मग इलेक्ट्रिक गाड्यांचा काही फायदा नाही", धोनीचं म्हणणं तुम्हालाही पटेल, पाहा VIDEO title=

MS Dhoni on Electic Vehicle: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) गाड्यांची प्रचंड आवड आहे. धोनीने गाड्यांचं मोठं कलेक्शन असून अनेकदा त्याने याबद्दल बोलून दाखवलं आहे. दरम्यान नुकतंच धोनीने सध्या क्रेझ असणाऱ्या विद्युत वाहनांच्या (Electic Vehicles) भविष्यावर भाष्य केलं आहे. उत्सर्जन आणि कार्बन फूटप्रिंटच्या (emissions and carbon footprint) समस्येला तोंड देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनं हा उपाय नसल्याचं धोनीचं मत आहे. 

महेंद्रसिंग धोनीला गाड्यांची क्रेझ आहे. त्याच्या बंगल्यात या गाड्या ठेवण्यासाठी त्याने स्वतंत्र जागा तयार केली आहे. बाईक कधीही तक्रार करत नाहीत त्यामुळे त्या आपल्या चांगल्या मित्र असल्याचंही धोनी सांगतो. दरम्यान, एका मुलाखतीत धोनीने ऑटोमोबाइल इंडस्ट्रीच्या भविष्यावर भाष्य केलं आहे. 

ईव्ही हा ‘उपाय’ नाही असे तो म्हणतोय. ते पुढे स्पष्ट करताना ते नमूद करतात की ईव्ही हे महत्त्वाचे नसून ईव्हीला वीज देण्यासाठी वीज कुठून येते हे वास्तव आहे. नूतनीकरण न करता येणार्‍या ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण होत असेल, तर मोटारींचे विद्युतीकरण करून आपण काहीही साध्य करत नाही.

lightorium ने इन्स्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत महेंद्रसिंग धोनी इलेक्ट्रिक वाहनांचं भविष्य काय असेल यावर बोलताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनं हा उपाय नसल्याचं तो या मुलाखतीत सांगत असल्याचं दिसत आहे. "इलेक्ट्रिक वाहनं महत्वाची नसून, त्यासाठी लागणारी वीज नेमकी कुठून येत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर वीज निर्माण करण्यासाठी त्याच पारंपारिक पद्धतींचा वापर होत असेल तर मग आपण इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून काहीच साध्य करत नाही आहोत," असं धोनीने म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Light (@lighthorium)

"वीजेची निर्मिती कशी होते हा खरा उपाय आहे. जर माझी वीज थर्मल पॉवर प्लांटमधून येत असेल तर मग आपण ठीक आहे म्हणून शकत नाही. त्यामुळे प्रदूषणास कारणीभूत न ठरणारी वीज निर्माण करणं आणि ऊर्जेच्या दृष्टीने इतर टिकाऊ गोष्टी असणं महत्त्वाचं आहे", असं धोनीने म्हटलं आहे. 

अनेक तज्ज्ञांनीही याआधी याकडे लक्ष वेधलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणार वीज नेमकी कुठून येत याकडे लक्ष दिलं पाहिजं. जर वीज निर्मिती करण्यासाठी अद्यापही कोळशाचा वापर होत असेल आणि त्यातूनच वाहनांची चार्जिंग केली जात असेल तर पर्यावरणाला असणारा धोका तितकाच आहे.