MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) म्हणजे क्रिडाविश्वातील नावाजलेलं नाव. भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली. असं असलं तरी धोनी आयपीएलचे (Dhoni IPL 2023) सामने खेळतो. मात्र, आता धोनी आयपीएलचे सामने खेळणार की नाही?, असा सवाल उपस्थित होत होता. अशातच आता धोनी पुन्हा आयपीएल खेळणार की नाही, याचं उत्तर खुद्द धोनीने दिलं होतं.
2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती घेतली. त्यानंतर देखील धोनी 2 हंगाम खेळला आहेत. अशातच आता धोनी पुन्हा मैदानात उतरून IPL 2023 सामने खेळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यासाठी धोनीने सराव देखील सुरू केलाय. आयपीएलला (IPL 2023) अद्याप 6 महिन्याचा अवधी असताना धोनीने सराव सुरू केला आहे.
सोशल मीडियावर धोनीचा सराव करताना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे धोनीने अद्यापतरी बॅट टेकवली नाही, हे निश्चित झालंय. क्रिकेटची संपूर्ण किट घालून धोनी मैदानात उतरेला दिसत आहे. झारखंड क्रिकेट असोशिएशनच्या (Jharkhand Cricket Association) नेटमध्ये धोनी क्रिकेट खेळताना दिसतोय.
MS Dhoni practicing at JSCA pic.twitter.com/Vjq7mQw2zQ
— Chakri Dhoni (@ChakriDhoni17) October 14, 2022
दरम्यान, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार (Most Successful Indian Captain) म्हणून धोनीची ओळख आहे. भारताकडून खेळताना धोनीने अनेक सामने जिंकवून दिलेत. त्याचबरोबर तीन आयपीएल ट्रॉफी (IPL Trophy) देखील धोनीने चेन्नईच्या (CSK) नावावर केल्या आहेत. धोनीचा चेन्नई संघाची विशेष नातं आहे. त्यामुळेच धोनीला त्याचा अंतिम सामना चैन्नईच्या मैदानावर खेळायचा आहे. तसं त्याने बोलून देखील दाखवलंय.