स्टंपमागून जोरदार कमेंट्री करणारा धोनी झोपेत नक्की काय बडबडतो?

काय? धोनीलाही ही वाईट सवय! लग्नाच्या 11 वर्षांनंतर पत्नी साक्षीकडून खुलासा

Updated: Jul 5, 2021, 05:47 PM IST
स्टंपमागून जोरदार कमेंट्री करणारा धोनी झोपेत नक्की काय बडबडतो?

मुंबई: नुकताच धोनी-साक्षीच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. धोनीनं आपल्या पत्नीला साक्षीला विंटेज कारही गिफ्ट केली. त्यानंतर साक्षीने धोनीच्या एक सवयीबद्दल खुलासा केला आहे. साक्षीने धोनीच्या एका सवयीची पोलखोल केली.

आयपीएल 2021 दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू होण्यासाठी अजूनतरी अवकाश आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनीचे अपडेट्स साक्षी आपल्या इन्स्टावरून चाहत्यांना देत असते. आता साक्षीने चाहत्यांसोबत एक खास सिक्रेट शेअर केलं आहे. 

साक्षीने एका मुलाखती दरम्यान सांगितले की महेंद्रसिंह धोनीला व्हिडीओ गेम्स खेळायला खूप आवडतं. रात्री झोपेत धोनीला पब्जी गेमबद्दल बडबडायची सवय असल्याचं साक्षीने सांगितलं आहे. चेन्नई सुपर किंग्जने याचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये साक्षीने सांगितले की, व्हिडीओ गेममुळे धोनीचे नेहमीच सक्रिय मन दुसरीकडे भटकत असतं. हा खेळ त्याच्या बेडरूममध्येही शिरला असल्याचं तिने सांगितलं.

धोनीला झोपेतही पब्जीबद्दल बोलण्याची सवय असल्याचा खुलासा केला आहे. मैदानात स्टम्पमागून बोलणारा धोनी चक्क बेडवर रात्री झोपेत पब्जीबद्दल बोलतो हे ऐकल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.