मुंबई विरुद्ध चेन्नई तिसऱ्यांदा आमने-सामने

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार सामना

Updated: May 7, 2019, 04:01 PM IST
मुंबई विरुद्ध चेन्नई तिसऱ्यांदा आमने-सामने title=

चेन्नई : आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई दरम्यान पहिली क्वालिफायरची लढत आज रंगणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता ही लढत सुरु होईल. मुंबई विरुद्ध चेन्नई या हंगामात तिसऱ्यांदा आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

क्वालिफायर वनमध्ये हे दोन तगडे संघ पुन्हा एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी झालेल्या दोन्ही लढतींमध्ये मुंबईनं विजय साकारला आहे. मात्र तरीही मुंबई पुन्हा चेन्नईला मात देईल याची काही शाश्वती नाही.

चेन्नईनं या हंगामात घरच्या मैदानावर सात लढतींपैकी सहा सामन्यांमध्ये विजय साकारला आहे. तर आतापर्यंत दोन्ही संघामध्ये झालेल्या एकूण २६ सामन्यांपैकी मुंबईनं १५ तर चेन्नईनं ११ वेळा विजय साकारला आहे. तर दोन्ही संघांनी २०-२० 'रन'संग्रामचं प्रत्येकी तीनवेळा विजेतेपद पटकालं आहे.