नरेंद्र मोदी स्टेडियमवर आहे ही खास सुविधा, जी जगात कुठेच नाही

जगातील सर्वात मोठ्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळांडूसाठी खास सुविधा असणार आहेत. 

Updated: Feb 24, 2021, 06:11 PM IST
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आहे ही खास सुविधा, जी जगात कुठेच नाही title=

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळाडूंसाठी खास सुविधा असणार आहेत. ज्या जगात कोणत्याच ठिकाणी दिल्या जात नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात २४ फेब्रुवारी २०२१ हा दिवस नेहमी स्मरणात राहिल. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे आज उद्घाटन करण्यात आले. आज याच मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना होत आहे. गुलाबी बॉलने डे-नाईट असा हा सामना खेळला जात आहे. 

गुलाबी बॉलने खेळताना संध्याकाळी फलंदाजांना खेळताना काही त्रास होऊ नये म्हणून येथे खास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एएनआयला गुजरात क्रिकेट एसोसिएशनचे अधिकारी यांनी माहिती दिली की, "मागील ७ ते ८ महिन्यापासून लाईटमुळे पडणाऱ्या सावलीवर काम केलं जात होतं.

सूर्यास्त होण्याआधी प्रकाश थोडा वेगळा असतो. त्यामुळे याबाबत ताळमेळ बसवण्यासाठी लाईटला ऑटो प्रोग्राम करण्यात आलं आहे. ज्यामुळे मैदानावर कशाचीही सावली पडणार नाही. ही सुविधा जगातील कोणत्याच मैदानावर नाहीये.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्याच्या आधी म्हटलं की, "पिंक बॉल हा लाल बॉलच्या तुलनेत अधिक स्विंग करतो. आम्ही जेव्हा बांगलादेश विरुद्ध २०१९ मध्ये सामना खेळला होता. तेव्हा याचा अनुभव आला होता. पिंक बॉलसोबत खेळणं आव्हानात्मक असतं. संध्याकाळी अधिक आव्हान वाढतं.''