लंडन : कोच अनिल कुंबळेबरोबर आपला कोणताही वाद नसल्याचं भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे. माझ्या आणि कुंबळेमध्ये वाद असल्याच्या बातम्या म्हणजे फक्त अफवा आहेत असंही कोहली म्हणाला आहे.
ड्रेसिंग रूममधल्या गोष्टींबाबत माहिती नसताना अशा बातम्या पसरवल्या जातात. अशा बातम्या कोण पसरवतं हे जाणून घ्यायची माझी इच्छा नाही, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली आहे. भारतीय टीम आणि कुंबळेमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहेत अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. भारताच्या नव्या कोचच्या नियुक्तीसाठी बीसीसीआयनं अर्जही मागवले आहेत.