भारतीय संघानंतर या खेळाडूचं IPL करिअर संपल, १० संघांकडून मिळाला ठेंगा

भारतीय संघातील उत्तम खेळाडूचं करिअर संपणार, IPL मध्ये कुणी विचारलही नाही... 

Updated: Feb 15, 2022, 08:08 AM IST
भारतीय संघानंतर या खेळाडूचं IPL करिअर संपल, १० संघांकडून मिळाला ठेंगा  title=

मुंबई : आयपीएल मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) मध्ये जगभरातील खेळाडूंकरता बोली लावली जाते. महत्वाचं म्हणजे अनेक खेळाडूंवर १० करोडहून अधिकची ही बोली लागली. तर काही खेळाडू असे राहिले ज्यांच्यावर कुणी बोली लावलीच नाही. (No one Buy this Indian Player in IPL Mega Auction His carrier over now ) एक असा खेळाडू आहे ज्याच इंटरनॅशनल आणि आयपीएल करिअर एकाचवेळी संपलं. या खेळाडूला ऑक्शनमध्ये कुणीच आपल्या संघात घेतलं नाही. 

या खेळाडूचं संपल करिअर 

भारतीय संघातील ओपनिंग फलंदाज मुरली विजय (Murali Vijay) एकेकाळी संघातील विश्वासू खेळाडू होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुरली विजयला संघात जागा मिळालेली नाही. 

डिसेंबर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात मुरली विजयने शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. 

त्यानंतर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालने त्याचा पत्ता पूर्णपणे कट केला. यानंतर पुन्हा मुरली विजयला संघात जागा मिळाली नाही. 

इंटरनॅशनल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये कधीच मुरली विजय तेवढा ऍक्टिव दिसला नाही. ३७ वर्षीय खेळाडूसमोर क्रिकेटमधून सन्यास घेण्याव्यतिरिक्त काहीच उपाय राहिलेला नाही. 

आयपीएलच्या ऑक्शनमधूनही पत्ता कट 

त्याचवेळी मुरली विजयला आयपीएल ऑक्शनमध्ये एकही खरेदीदार मिळाला नाही. यंदाच्या लिलावातही विजयने आपले नाव दिले होते पण तो कोणत्याही संघाला पसंत पडला नाही.

विजयने 2018 ते 2020 या कालावधीत 6 रिक्त आयपीएल सामने खेळले. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की टीम इंडियानंतर आता या खेळाडूची आयपीएल कारकीर्दही संपली आहे.

आता आगामी काळात हा खेळाडू कोणत्याही संघाच्या वतीने आयपीएल खेळताना दिसणार नाही.

हा खेळाडू ठरला बेस्ट ओपनर 

रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज आहे. एकदिवसीय आणि टी-20 मध्ये जगावर राज्य करणाऱ्या रोहितने पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये परदेशी भूमीवर एकही शतक झळकावले नाही. 

पण नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यावरही त्याने हा पराक्रम केला. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके आहेत, सध्या दुसरा कोणताही फलंदाज रोहितच्या या विक्रमाच्या जवळपासही नाही.