IND vs AUS: रोहित शर्माची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने टीम इंडियावर पराभवाची नामुष्की

IND vs AUS: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) पहिल्या 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली 66 रन्सने भारताचा पराभव झाला. दरम्यान यावेळी रोहितच्या एका चुकीने हा पराभव झाल्याचं म्हटलं जातंय.

सुरभि जगदीश | Updated: Sep 28, 2023, 10:27 AM IST
IND vs AUS: रोहित शर्माची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने टीम इंडियावर पराभवाची नामुष्की title=

IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला ( Team India ) पराभवाचा सामना करावा लागला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) पहिल्या 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली 66 रन्सने भारताचा पराभव झाला. दरम्यान यावेळी रोहितच्या एका चुकीने हा पराभव झाल्याचं म्हटलं जातंय.

तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा पराभव

तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसरा सामना जिंकण्यासाठी भारताला 353 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. मात्र टीम इंडियाच्या ( Team India ) फलंदाजांना हे लक्ष्य पार करणं जमलं नाही. त्यामुळे भारताला 66 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यामध्ये शुभमन गिलच्या अनुपस्थितीत वॉशिंग्टन सुंदर कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंगला आला होता.

मात्र दिलेल्या संधीचं वॉशिंग्टनला सोनं करता आलं नाही. रोहितसोबत ओपनिंगला आलेल्या 30 बॉल्समध्ये 18 रन्स करून बाद झाला. मात्र यावेळी कर्णधार रोहित शर्मा दुसरीकडून खंबीरपणे उभा राहिला. आक्रमक फलंदाजी करताना त्याने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच चोपलं. रोहित शर्माने 57 बॉल्समध्ये 81 रन्सची खेळी केली. 

दरम्यान कर्णधार आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराटने भारताच्या विजयाची जबाबदारी होती. मात्र त्यांना टीमला विजय मिळवून देता आला नाही. यानंतर केएल राहुलने 26, सूर्या 8 आणि जडेजाने 35 रन्स केले.

रोहितची चूक ठरली पराभवाला जबाबदार

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अनेक चुका केल्या. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी फिल्डींग दरम्यान त्याने स्पिनर्सना उशीर गोलंदाजी दिली. फलंदाजी करताना त्याने वॉशिंग्टन सुंदरला ओपनिंगला संधी दिली. वॉशिंग्टन टीमला सुरुवातीला भारताला दमदार सुरुवात करता आली नाही. त्यामुळे रोहितचा हा निर्णय टीम इंडियाला पराभवासाठी जबाबदार ठरला.

रोहित शर्माने रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे या खेळीदरम्यान त्याने तब्बल 5 सिक्स ठोकले. यावेळी रोहितने सिक्सेच्या बाबतीतला एक मोठा विक्रम केलाय. रोहित शर्मा हा एका देशात सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने भारतात 257 सिक्स मारले आहेत.