मुंबई : गुरुवारी मॅनचेस्टरमध्ये वेस्टइंडिजच्या विरोधात हार्दिक पंड्याने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या कामगिरीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. पंड्याने 38 बॉलमध्ये 46 रन केले होते. यानंतर पंड्याने बॉलिंग करताना सुनील एम्ब्रिसला 31 रनवर माघारी पाठवलं. पंड्या हा भारतीय टीममधला एक मोठा खेळाडू आहे. त्याच्या कामगिरीवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. त्यातच आता पाकिस्तानच्या एका माजी दिग्गज बॉलरने मोठं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानचा माजी ऑल-राउंडर अब्दुल रज्जाकने पंड्याच्या कामगिरीवर वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटलं की, पंड्याच्या खेळीमध्ये काही कमतरता जाणवते. रज्जाकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'मी 2 आठवड्यात हार्दिक पंड्याला जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर बनवू शकतो.'
त्यानं म्हटलं की,' मी भारत आणि वेस्टइंडिज यांचा सामना पाहिला. पहिल्यांदा हार्दिक पंड्याचं मी जवळून निरीक्षण केलं. त्याचं फूटवर्क, बॉडी बॅलेंसमध्ये कमतरता जाणवते.'
रज्जाकने पुढे म्हटलं की, 'जर मी पंड्यावर 2 आठवडे काम केलं तर मी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करु शकतो. दुबईमध्ये त्याच्यासोबत काम केलं तर मला आशा आहे की, मी त्याला जगातील नंबर वन हिटर बनवू शकतो.'
रज्जाकने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडे मागणी केली आहे की, 'जर बीसीसीआयला पंड्यावर काम करायचं असेल तर मी त्यासाठी तयार आहे. 2 आठवड्यात त्याला मी सर्वश्रेष्ठ खेळाडू बनवू शकतो.'
Abdul Razzaq "give me 2 weeks and I will make Hardik Pandya the world's best all-rounder" #Cricket pic.twitter.com/o3eIt69nfN
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 27, 2019
पाकिस्तानकडून खेळताना अब्दुल रज्जाकने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 46 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 1946 रन घेत 100 विकेट घेतल्या आहेत. सोबतच 265 वनडे सामन्यांमध्ये त्याने 5080 रनसह 269 विकेट घेतल्या आहेत.
So today I have been closely observing Hardik pandya and I feel like I see a lot of faults in his body’s balance when hitting the bowl hardly and I observed his footwork aswell and I see that also let’s him down sometimes and I feel like if I give him Coaching in for example UAE
— Abdul Razzaq (@ARazzaqPak) June 27, 2019