India vs England, T20 World Cup 2022 2nd Semi Final: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा पहिला सामना सिडनीच्या मैदानावर पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड (NZ vs PAK 1st Semi-Final) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत फायनलचं (Pakistan in final) तिकीट कन्फर्म केलंय. त्यामुळे आता भारत देखील सेमीफायनल जिंकून पाकिस्तानला फायनलमध्ये लोळवण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng 2nd Semi-final:) यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना अॅडिलेटच्या मैदानावर खेळला जाणार आहे. अशातच आता सामन्याआधीच इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलरला (Jos Buttler) टेन्शन आलंय.
सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुखापतीमुळे इंग्लंडच्या दोन बलाढ्य खेळाडूंच्या सेमीफायनच्या खेळावर सस्पेंस कायम आहे. स्टार फलंदाज डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) हे दोन्ही खेळाडू सराव सत्रातही दिसले नाहीत. त्यामुळे आता इंग्लंडच्या सामन्याआधीच दोन विकेट पडल्यात की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यावर आता कॅप्टन जॉस बटलरने मोठं वक्तव्य केलंय.
मालन आणि वुड दोघांचं (Dawid Malan and Mark Wood injury) खेळणं सस्पेन्समध्ये आहे. पण सामन्याच्या दिवशी दोघांची अवस्था काय आहे त्यावर निर्णय घेऊ. आमचा आमच्या मेडिकल टीमवर विश्वास आहे. हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त असावेत, अशी इच्छा देखील त्यानं यावेळी बोलून दाखवली. संघातील प्रत्येक खेळाडूवर आमचा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा आम्ही युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनी चांगली कामगिरी केली होती, असं बटलर म्हणाला.
आणखी वाचा- जखमी कॅप्टनचा आवेश पाहून 'तो' ड्रसिंग रूममध्ये बसला लपून, रोहित तावातावात आला अन्...
दरम्यान, डेव्हिड मलान च्या जागी संघात फिल सॉफ्टला (Phil Salt) समिल केलं जाण्याची शक्यता आहे. त्यावर देखील बटलरने वक्तव्य केलंय. फिल सॉल्ट हा एक चांगली मानसिकता असलेला खेळाडू आहे, विशेषत: T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करतो. आमची नजर संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर आहे, असंही बटलर म्हणाला आहे.