श्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये

श्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. 

Updated: Jun 12, 2017, 11:11 PM IST
श्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये  title=

लंडन : श्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करण्यासाठी दोन्ही टीमना ही मॅच जिंकावीच लागणार होती. श्रीलंकेनं दिलेल्या २३७ रन्सचं आव्हान पार करताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आले. पण श्रीलंकेनं केलेल्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे अखेर पाकिस्तानचा ३ विकेट आणि ३१ बॉल्स राखून विजय झाला.

२३७ रन्सचा पाठलाग करताना ७ बाद १६२ रन्स अशी झाली होती पण सरफराज अहमदच्या नाबाद ६१ रन्स आणि मोहम्मद आमीरच्या नाबाद २८ रन्समुळे पाकिस्तानचा विजय झाला.

सेमी फायनलमध्ये आता पाकिस्तानची गाठ इंग्लंडशी पडणार आहे १४ जूनला हा सामना होईल तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला बांग्लादेशबरोबर १५ जूनला होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रविवारी १८ जूनला होणार आहे.