Pakistan new captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे पाकिस्तानच्या टेस्ट आणि वनडे, टी 20 कर्णधारांच्या प्रदर्शनापासून थोडे निराश दिसत आहेत. शान मसूद आणि शाहीन शाह अफरीदीच्या कॅप्टन्सीवर PCB ने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच पीसीबीच्या सूत्रांकडून असे वर्तवण्यात येतेय की, पाकिस्तान संघाचा पूर्व कप्तान बाबर आजम याला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे पून्हा कॅप्टन्सी देण्याच्या विचारात आहे. मागील वर्षी भारतामध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपनंतर बाबरने साऱ्या फॉर्मॅट्समधून कर्णधारपद सोडले होते. यानंतर शान मसूद याला टेस्टचा आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्याकडे वनडे आणि टी 20 चे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
शान मसूद आणि शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपद सोपवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला, पाकिस्तानमध्ये झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये 3-0 अशी मात दिली होती, तर शाहीनच्या कॅप्टन्सीखाली न्यूझीलंडने पाकिस्तानला टी 20 सिरीजमध्ये 4-1 च्या फरकाने हरवले होते. यावर एका सूत्राने असे सांगितले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील सदस्य यांना शान मसूद आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या कॅप्टन्सीवर शंका निर्माण झालेली आहे आणि अशी बातमी समोर आलेली आहे की, पीसीबीचे सदस्य या दोघांच्या कामगिरीवर खूप निराश आहेत. शान आणि शाहिन यांच्या कॅप्टन्सीखाली पाकिस्तान टीमने खूप खराब प्रदर्शन केले होते, यामुळे आता पीसीबीमध्ये कर्णधारपदावरून गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'बाबर हा पून्हा पाकिस्तान क्रिकेट टीमचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी तयार आहे, पण त्याच्या काही अटी आहेत.' अशी गोष्ट समोर आलेली आहे, कारण याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जका अशरफ यांनी व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदारून बाबर आजमचा हकालपट्टी केली होती. यानंतर बाबर आजमने टेस्ट क्रिकेटच्या संघाची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला होता. बाबर हा 2020 पर्यंत पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी होता पण यानंतर एशिया कप आणि वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनामुळे त्याला कर्णधारपदावरून काढण्यात आले होते.