...तर आम्ही भारताचे आजन्म ऋणी राहू- शोएब अख्तर

आम्ही त्यांच्या या मदतीसाठी....... 

Updated: Apr 9, 2020, 09:32 AM IST
...तर आम्ही भारताचे आजन्म ऋणी राहू- शोएब अख्तर  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता संपूर्ण जगभरात असणाऱ्या चिंतेच्या वातावरणात दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचं हे संकट फोफावत असतानाच आता पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील माजी खेळाडू, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने या घडीला पाकिस्तान आणि भारत या दोन्ही शेजारी राष्ट्रांनी एकत्र येऊन एकमेकांना आधार दिला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. 

'भारताने आमच्यासाठी १० हजार व्हेंटिलेटरची निर्मिती केल्यास पाकिस्तान, एक राष्ट्र म्हणून आम्ही त्यांच्या या मदतीसाठी आजन्म ऋणी राहू', असं शोएब म्हणाला असून, सर्वतोपरी निर्णय हे अधिकाऱ्याकडूनच घेतले जातील असं स्पष्ट केलं. 

एकिकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या राजकिय तणावाच्या परिस्थितीमुळे अनेक व्यवहार ठप्प झालेले असतानाच अख्तरने भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांच्या क्रिकेट संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाऊन त्या माध्यमातून कोरोनाशी लढण्यासाठीच्या मतदनिधीत योगदान देण्याचा विचार त्याने सर्वांपुढे मांडला. 'पीटीआय'शी संवाद साधतना शोएबने त्याचे हे विचार मांडले. 

असे सामने खेळवले गेले तर, कोणीही त्याच्या निर्णयावरुन आणि अंतिम निकालावरुन निराश होणार नाही, असं म्हणत विराट कोहलीने शतकी खेळी खेळली तर आम्हाला आनंद होईल किंवा बाबर आझमने शतक ठोकलं तर तुम्हाला आनंद होईल. कारण, या क्षणाला हे दोन्ही संघ विजेतेच असतील हे त्याने सांगितलं. 

 

मुंबईच्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये जाऊऩ आपण, गरजूंना मदतीला हात दिल्याची बाबही त्याने यावेळी मांडली. वाहन चालकांपासून ते रनर आणि सुरक्षा रक्षकांची आपण मदत केल्.याचं सांगत आपल्याला ज्या देशातून अर्थार्जनाची संधी मिळते तेथील आपल्या सहकाऱ्यांची मदत करण्याचीच भावना यामागे असल्याचंही त्याने सांगितलं.