"एखाद दिवस सेहवाग भेटला तर त्याला खूप मारेन", पाकिस्तानी क्रिकेटर असं का म्हणाला?

क्रिकेट चाहते भारत विरुद्ध पाकिस्तान  (Ind and Pak) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यांची आवर्जून वाट पाहत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्या दोघात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. 

Updated: Mar 20, 2022, 08:43 PM IST
"एखाद दिवस सेहवाग भेटला तर त्याला खूप मारेन", पाकिस्तानी क्रिकेटर असं का म्हणाला? title=

मुंबई : सध्या क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 15 व्या मोसमांचं वेध लागंलंय. मात्र आयपीएलपेक्षा क्रिकेट चाहते भारत विरुद्ध पाकिस्तान  (Ind and Pak) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यांची आवर्जून वाट पाहत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्या दोघात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र यानंतरी उभयसंघाचे खेळाडू हे कायम चर्चेत असतात. आता पाकिस्तानच्या शोएब अख्तरने  (Shoaib Akhtar) टीम इंडियाचा आक्रमक ओपनर बॅट्समन वीरेंद्र सेहवागबाबत (Virender Sehwag) विधान केलंय. (pakistani former fast bowler shoaib akhatar give funny replay on team india virender sehwag comment)

अख्तरच्या बॉलिगंने नेहमीच सेहवागच्या बॅटने जोरदार फटके खाल्लेत. सेहवागच्या बॅटने कायम फटके खात आलेल्या अख्तरने आता सेहवागला मारण्याची भाषा केलीय. "सेहवाग एखाद दिवस मला भेटला तर मी त्याला खूप मारेन", असं म्हणालाय. मात्र अख्तर हे सर्व मस्तीत म्हणालाय.

नक्की प्रकरण काय? 

त्याचं झालं असंय की हे दोघेही क्रिकेटर कायम ट्विटर सक्रीय असतात. ट्विटर एकमेकांची खिल्ली उडवत असतात. असंच काही दिवसांपूर्वी शोएबने छान सुटाबुटातला फोटो ट्विट केला होता. याच फोटोवर सेहवागने मजेशीर कमेंट केली होती. 
 
सेहवागने अख्तरचा हा फोटो पाहून "ऑर्डर लिख, एक बटर चिकन, दो नान आणि एक बिअर", अशी मजेशीर कमेंट केली. अख्तरने आता या कमेंटवर प्रत्तुत्तर दिलंय. 

सेहवागच्या या कमेंटवरुन यूट्युब चॅट शो दरम्यान याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावरुन अख्तर हसू लागला. या प्रश्नावर काय उत्तर द्यावं, हे अख्तरला कळलं नाही. यावर अख्तर "सेहवाग एखाद दिवस मला भेटला तर मी त्याला खूप मारेन",असं म्हणाला.