Paris Olympics 2024: भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकलाय. ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे हे पाचवे मेडल आहे. पाकिस्तानच्या अरशद नदीमने 92.97 मीटर इतका भाला फेकत गोल्ड मेडल आपल्या नावे केलंय. 26 वर्षाच्या नीरज चोप्राचा दुसरा थ्रो त्याचा एकमेव वैध थ्रो होता. ज्यामध्ये त्याने 89.45 मीटर फेकलेला थ्रो या सिझनचा त्याचा सर्वश्रेष्ठ थ्रो होता. याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकल होतं.
नीरज चोप्रा भारताचा यशस्वी आणि श्रीमंत अॅथलिटच्या यादीत मोडतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2024 पर्यंत नीरज चोप्राचे नेटवर्थ 4.5 मिलियन डॉलर (साधारण 37 कोटी रुपये) इतके आहे. नीरज चोप्राला मॅच फीस आणि ब्राण्ड एंडोसमेंटमधून मोठी कमाई होते. क्रिकेटवेड्या भारतात नीरज चोप्राने स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. जाहिरात क्षेत्रात नीरज चोप्राचा दबदबा पाहायला मिळतो.
नीरज चौप्राकडे स्पोर्ट्स किट ब्रॅण्ड नायकी, स्पोर्ट्स ड्रिंक ब्रॅण्ड गेटोरेड, टाटा एआय लाइफ इन्श्योरन्स, क्रेडीट कार्ड अॅप क्रेड सारखे मोठे ब्रॅण्ड आहेत. या कंपन्याचे ब्रॅण्डींग करुन खूप मोठी कमाई करतो. नीरज चोप्राच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर स्पोर्ट, फोर्ड मस्टॅंग जीटी, टोयोटा फॉर्चुनर आणि महिंद्रा थार अशा महागड्या कारचा समावेश आहे.
भालाफेक हा सर्वाधिक कठीण असलेल्या खेळांपैकी एक मानला जातो. ज्यमध्ये खेळाडुचे फिटनेस मजबूत असणे अनिवार्य असते. नीरज चोप्रा आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतो. नीरज चोप्रा आपल्या शरीरात 10 टक्के फॅट राहिल यासाठी प्रयत्न करत असतो. दिवसाची सुरुवात नारळ पाणी पिऊन करतो. तसेच नाश्त्यामध्ये 3-4 अंडी, 2 ब्रेड आणि वाटी डाल किंवा फळ खातो, असे त्याने एका मुलाखतीत सांगितलं होते.
नीरज चोप्राला ब्रेड ऑम्लेट खूप आवडते. जे तो आठवड्यातून एकदा तरी खातो. सकाळच्या जेवणात दही आणि तांदळाच्या पदार्थांसोबत डाळ, ग्रिल्ड चिकन आणि सलाड खातो. ट्रेनिंग सेशन आणि जिमच्या दरम्यान तो सुका मेवा, विशेषत: बदाम आणि फ्रेश ज्यूसचे सेवन करतो. तसेच रात्रीच्या जेवणार अधिकतर सूप, उकडलेल्या भाज्या आणि फळे खातो.
नीरज चोप्रा आपल्या नाश्ता आणि जेवणात प्रोटीन जास्त असतील याची काळजी घेतो. ज्यामुळे त्याच्या शरीरात ठराविक फॅट राहण्यास मदत होते. डाएट पूर्ण करण्यासाठी तो प्राटीन सप्लीमेंटचा उपयोग करतो. नीरजने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये आपले ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर वजन कमी करण्यावर भर दिला. यासाठी त्याने आपल्या डाएट चार्टमध्ये मोठा बदल केला. व्यायाम करताना कार्डियोवर जास्त भर दिला. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.