IPL 2021 : 'या' कारणामुळे धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनं वाढवलं पंजाब किंग्सचं टेन्शन

ख्रिसमुळे का वाढलं पंजाबचं टेन्शन? काय आहे कारण वाचा सविस्तर

Updated: Jul 11, 2021, 09:15 PM IST
IPL 2021 : 'या' कारणामुळे धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनं वाढवलं पंजाब किंग्सचं टेन्शन title=

मुंबई: कोरोनामुळे 4 मे रोजी स्थगित झालेल्या आयपीएलच्या स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा खेळवण्यात येणार आहेत. UAEमध्ये या स्पर्धा होणार असून त्याआधी पंजाब किंग्स संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. धडाकेबाज फलंदाज ज्याच्या येण्यानं नुसता बॉलर्सना घाम फुटतो अशा ख्रिल गेलनं पंजाबची चिंता वाढवली आहे. 

ख्रिसमुळे का वाढलं पंजाबचं टेन्शन?

वेस्ट इंडीजचे सर्व खेळाडू टी -20 विश्वचषकासाठी चांगली कामगिरी करत आहेत. फक्त टी -20 क्रिकेटमधील बॉस ख्रिस गेलच्या बॅटला मात्र घरघर लागली आहे. गेल दोन वर्षांच्या अंतरानंतर मार्च 2021 मध्ये कॅरेबियन टी -20 संघात परतला. माघारी परतल्यानंतर गेलने नऊ सामने खेळले आणि एकदाही सामना जिंकणारा डाव खेळू शकलेला नाही.

एकूणच गेलची कामगिरी विशेष चांगली पाहायला मिळाली नाही. त्याने 9 सामन्यांमध्ये 0, 16, 13, 32*, 8, 5, 11, 4, 13 अशी कामगिरी केली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 1000हून अधिक सिक्स ठोकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गेलला यावेळी मात्र 9 चौकार आणि 5 सिक्स ठोकण्यात यश मिळालं आहे. 

आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाकडून गेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात पंजाबची विशेष कामगिरी पाहायला मिळाली नाही. टी 20 च्या 9 सामन्यांमधील त्याची वाईट कामगिरी पाहता आता पंजाब किंग्सचं टेन्शन वाढलं आहे. 

टी -20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज संघाने अजूनही चांगली कामगिरी बजावली आहे. गेल्या 11 दिवसांत कॅरेबियन संघाने चारपैकी तीन टी -20 सामने जिंकले आहेत. रविवारी शिमरोन हेटमायरच्या अर्धशतकाच्या फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 56 धावांनी पराभूत करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0  अशी आघाडी मिळविली.