मुंबई: क्रिकेट खेळाडू अनेकदा मैदानावरही चांगले मित्र बनतात. एकत्र खेळणे, प्रवास करणे आणि त्याच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणं या खेळाडूंमध्ये बरेच प्रेम वाढत असतं. सख्ख्या भावासारखे राहणारे काही वेळा एकमेकांचे शत्रू देखील होतात. जे एकेकाळी सख्ख्या भावासारखे राहायचे मात्र कालांतराने एकमेकांचे शत्रू बनले. एकमेकांबद्दल बोलणंही टाळू लागले. आज अशाच काही टीम इंडियातील खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीबद्दल बरीच चर्चा झाली होती. या दोन्ही खेळाडूंनी शालेय पातळीवरील एक स्पर्धेत 664 धावा रेकॉर्ड केला होता. पण त्यानंतर अचानक त्यांच्या नात्यात दुरावा आला. दोन्ही खेळाडू वर्षानुवर्षे एकमेकांशी बोलले नाहीत. एकदा कांबळीने असेही म्हटलं होतं की एकदा त्याला मदत हवी होती पण सचिनने आयुष्यात त्याला मदत केली नाही.
दिनेश आणि मुरली विजय सख्ख्या भावासारखे खास एकमेकांचे मित्र होते. दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीचा मुरली विजयवर जीव जडला. त्यानंतर मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्या नात्यात दुरावा आला. मुरली विजयसोबत दिनेशच्या पहिल्या पत्नीनं लग्न केल्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत अबोल धरला.
टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि दिग्गज फलंदाज गौतम गंभीर यांच्यातील द्वंद्व सर्वांनाच माहिती आहे. सुरुवातीच्या काळात विराटने गंभीरशी चांगली मैत्री केली होती आणि एकदा गंभीरने कोहलीला प्लेयर ऑफ दा मॅच पदवीही दिली होती. पण आयपीएलच्या काळात गंभीर आणि कोहली यांच्यात वाद झाला आणि दोघांच्या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला.
टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार असलेले महेंद्रसिंग धोनीचं तसं विशेष कोणसोबत पटत नाही असं होत नाही. मात्र धोनी आणि सेहवागचं पटत नाही हे देखील तेवढंच खरं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी महेंद्रसिंह धोनीने खराब फील्डिंगचं कारण देत वीरूभाईला संघातून बाहेर केलं होतं. हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे धोनी आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांमध्ये दुरावा आल्याचं पाहायला मिळालं आहे.
टीम इंडियाला दोन वर्ल्डकप जिंकवून देणारे धोनी आणि युवराज यांची जोडी तर जगभर प्रसिद्ध होती. दोघंही भावासारखे राहायचे. मात्र युवराजला कॅन्सरवर मात करून पुन्हा संघात परतल्यानंतर मात्र त्याला बऱ्याचदा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलं. त्यानंतर धोनी आणि युवीमध्ये जे बिनसलं ते आजपर्यंत नीट होऊ शकलं नाही. इतकच नाही तर युवराजच्या वडिलांनी धोनीवर गंभीर आरोपही केले होते. युवराजचं करियर संपवण्यात धोनीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.