मुंबई : क्रिकेटर पृथ्वी शॉला डोपिंग प्रकरणी दोषी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, पृथ्वीला आठ महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. पृथ्वी शॉसोबत आणखी २ खेळाडूंना देखील ८ महिने खेळता येणार नाहीय.
भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉने नकळतपणे एका प्रतिबंधित पदार्थाचं सेवन केलं होतं, जो कन्टेन्ट सामान्य कफ सिरफ म्हणजेच खोकल्याच्या औषधात देखील असतो.
बीसीसीआयने म्हटलंय, शॉने २२ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूरच्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका सामन्या दरम्यान, ऍन्टी डोपिंग चाचणीसाठी आपल्या लघवीचा नमुना दिला होता. चाचणीत त्यात टर्बुटालाइन सापडलं आहे, जे वाडाच्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत नमूद आहे.
बीसीसीआयने म्हटलंय की, शॉने आपल्यावर लागलेले आरोप मान्य केले आहेत, पण आपण हे जाणूनबुजून नाही, तर खोकला येत असल्याने आपण, हे कफ सिरप घेतलं होतं.
बोर्डाने म्हटलंय की, पृथ्वी शॉने जे उत्तर दिलं आहे, त्यावर बोर्ड पूर्णपणे समाधानी आहे, पृथ्वी शॉने हे औषध खोकला येत होता, म्हणून घेतलं होतं.
बीसीसीआयने कायद्यानुसार म्हटलंय, पृथ्वी शॉवर आठ महिन्यासाठी बंदी लावण्यात येत आहे. ही बंदी १६ मार्च २०१९ पासून विचारात घेतली जाईल आणि १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ती कायम असेल.
पृथ्वी शॉ सोबत विदर्भ क्रिकेटसाठी खेळणारे अक्षय दुलारवर आणि राजस्थानसाठी खेळणारे दिव्य गजराज यांना देखील ८ महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
पृथ्वी शॉ पहिल्या टेस्टपासून हिरो
मुंबई क्रिकेट संघासोबत असलेला पृथ्वी शॉ मागील वर्षी आपल्या खेळाच्या प्रतिभेने जगासमोर आला, ज्यावेळेस त्याने वेस्टइंडीज विरोधात आपल्या पहिल्याच टेस्ट सामन्यात शतक झळकवलं.
तेव्हा शॉ हा सचिन तेंडुलकरनंतर टेस्ट सामन्यात शतक लगावणारा दुसरा युवा भारतीय क्रिकेटर ठरला. तसेच तो कमी वयात टेस्ट सामन्यात शतक लगावणारा, सर्वात कमी वयाचा भारतीय क्रिकेटर ठरला.
टेस्ट सामन्यात कमी वयात शतकाचं रेकॉर्ड करण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहे, सचिनने १७ वर्ष आणि ११२ दिवस वय असताना शतक लगावलं होतं. पृथ्वी शॉने जेव्हा शतक लगावलं, तेव्हा त्याचं वय १८ वर्ष आणि ३२९ दिवस होतं.