Delhi Premier League T20 : 23 वर्षीय फलंदाज प्रियांश आर्य याने भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह प्रमाणे एका ओव्हरमध्ये 6 सिक्स करण्याची कामगिरी केली आहे. दिल्ली प्रीमियर लीगच्या सामन्यात साऊथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना प्रियांश आर्य याने 12 व्या ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर सिक्स ठोकले. साउथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध नार्थ दिल्ली स्ट्राइकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात प्रियांशने दमदार फलंदाजी करून शतक सुद्धा लगावले. प्रियांशने 120 तर आयुष बडोनीने 165 धावा केल्याने साऊथ दिल्ली टीमने 308 धावांचा मोठा स्कोअर बनवला.
सामन्यात बॅटिंग करताना साऊथ दिल्ली सुपरस्टार्सने नॉर्थ दिल्लीच्या टीमला विजयासाठी 309 धावांचे आव्हान दिले. एवढा मोठा स्कोअर उभारण्यात आयुष बडोनी आणि प्रियांश आर्य यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रियांशने इनिंगच्या 12 व्या ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर सिक्स मारले. प्रियांशला ही ओव्हर मनन भरद्वाजने फेकली होती. प्रियांशने या सामन्यात अवघ्या 40 बॉलमध्ये शतक पूर्ण केले. तर 50 बॉलमध्ये त्यांनी 120 धावांची कामगिरी केली, ज्यात 10 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता.
There’s nothing Priyansh Arya can’t do #AdaniDPLT20 #AdaniDelhiPremierLeagueT20 #DilliKiDahaad | @JioCinema @Sports18 pic.twitter.com/lr7YloC58D
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 31, 2024
प्रियांश वगळता आयुष बडोनी हा सुद्धा गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने 55 बॉलमध्ये 19 सिक्स आणि 8 चौकार ठोकून 165 धावांची जबरदस्त कामगिरी केली. आयुषने 300 धावांच्या घातलं स्ट्राईक रेटने फलंदाजी करून गोलंदाजांची धुलाई केली. आयुषने केवळ 39 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. आयुष बडोनीने सुद्धा प्रियांश प्रमाणे अनेक ओव्हरमध्ये लागोपाठ सिक्स ठोकले.
हेही वाचा : IPL 2025 मध्ये BCCI मोठे बदल करण्याच्या तयारीत, 2 नियमांमध्ये होणार बदल?
साऊथ दिल्ली सुपरस्टार्सने दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्याच सीजनमध्ये कमाल प्रदर्शन केलं. आतापर्यंत झालेल्या 7 सामन्यात दिल्ली टीमने ५ सामने जिंकले आहेत. फक्त २ सामन्यातच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या साऊथ दिल्लीची टीम १० पॉईंट्सने दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानी ईस्ट दिल्ली राइडर्स ही टीम आहे.