WWE सुपरस्टार शॅड गॅस्पर्डचा बुडून दुर्दैवी मृत्यू

कॅलिफोर्नियातील वेनिस समुद्रचौपाटीवर शॅड त्याच्या १० वर्षाच्या मुलासोबत स्विमिंग करत होता.   

Updated: May 21, 2020, 04:28 PM IST
WWE सुपरस्टार शॅड गॅस्पर्डचा बुडून दुर्दैवी मृत्यू

मुंबई : WWE सुपरस्टार शॅड गॅस्पर्ड आपल्या १० वर्षांच्या मुलासोबत कॅलिफोर्नियातील वेनिस समुद्रचौपाटीवर स्विमिंग करत होता. त्यावेळी अचानक मोठी लाट आली दोघेही बुडू लागले. अशा परिस्थितीत शॅडने लाईफगार्ड रक्षकांना मुलाला सर्व प्रथम शोधण्याच्या सूचना दिल्या. या शोधकार्यात शॅड मात्र कायमचाच हरवला. त्याला शोधण्यासाठी देखील पथक सज्ज होते. अखे र बुधवारी लॉस एंजलिस येथे त्याचे शव सापडले.  शॅड गॅस्पर्ड ३९ वर्षांचा होता. तेथील पोलिसांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'लॉस एंजलिस याठिकाणी आम्हाला एका अफ्रिकन-अमेरिकन पुरूषाचे शव सापडले आहे. त्याची उंची सहा फुट आणि २४० एवढं वजन असेल एवढा एक व्यक्ती सापडला आहे. रविवारी आमच्याकडे आलेला बोपत्ता WWEच्या वर्णानुसार हे शव शॅड गॅस्पर्डचे असल्याची दाट शक्यता आहे.' त्याच्या अचानक जाण्याने   WWE क्रिडा विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. 

पण या अपघातात शॅडच्या मुलाला वाचवण्यात  लाईफगार्ड रक्षकांना यश आले आहे. तो सध्या सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून  शॅडला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू होते. त्यामुळे लाईफगार्ड देखील त्याला वाचवण्यासाठी धावले पण समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये तो गायब झाला. ही घडना घडली तोव्हा तो समुद्रकिनाऱ्यापासून ४६ मीटर लांब होता.