LSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा

पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती.

Updated: Apr 15, 2023, 07:27 PM IST
LSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा title=

LSG vs PBKS : आयपीएलमध्ये आज 21 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच पंजाबच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती. मात्र लखनऊ सुपर जाएंट्सच्या सामन्यात इंग्लंडचा खेळाडू सॅम करन टीमचं नेतृत्व करणार आहे.

पंजाबने जिंकला टॉस

लखनऊ विरूद्ध पंजाय यांच्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करन टॉससाठी आज मैदानात उतरला होता. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन या सामन्यात खेळू शकणार नाहीये. त्यामुळे त्याच्या जागी सॅमकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

शिखर धवन आजच्या सामन्यातून बाहेर

पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार शिखर धवन लखनऊविरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी सॅम करण टीमची धुरा सांभाळणार आहे. दुखापतीमुळे धवन या सामन्यात खेळू शकणार नाहीये.

दोन्ही टीम्सची प्लेईंग 11

लखनऊ सुपर जाएंट्स

केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हूड्डा, निकोलस पूरन (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, आयूष बदोनी, रवि बिश्नोई, मार्क वुड, आवेश खान, युद्धवीर सिंग . 

पंजाब किंग्स 

अथर्व तायदे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंह भाटिया, सिकंदर रजा, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत बराड़, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह