IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत

India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. 

Updated: Feb 3, 2023, 07:01 PM IST
IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत title=

India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे. तसेच टीम इंडियाच्या गोलंदाजांचा कसा सामना करायचा यावरही तोडगा काढयचा प्रयत्न चाललाय. असाच तोडगा आता त्यांनी टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर आर. आश्विनवर (ravichandran ashwin) काढला आहे. अश्विन सारखीच हुबेहुब गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजाला त्याने नेट्समध्ये बोलावून घेतले आहे. आणि अशाप्रकारे ते स्पिन बॉलिंगचा सामना करतायत. मात्र हा खेळाडू कोण आहे? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

 

हे ही वाचा : Team India ला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती

 

अश्विनचा डुप्लिकेट कोण?

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे. हा अश्विनचा डुप्लिकेट महिश पिठिया (Mahesh Pithiya) आहे, जो हूबेहूब अश्विनसारखीच बॉलिंग टाकतो. 

असा सराव केला

कसोटी दौऱ्याच्या पहिल्या सराव सत्रात ऑस्ट्रेलियन संघाने रविचंद्रन अश्विनचा (ravichandran ashwin) डुप्लिकेट (महिश पिठियाच्या)  गोलंदाजीचा सामना केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी फिरकीचा मुकाबला करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. महिश पिठिया ऑस्ट्रेलियाच्या नेट्समध्ये नेट बॉलर्सच्या भूमिकेत होता. पिठियाने कोणताही ब्रेक न घेता सतत गोलंदाजी केली आणि स्मिथ, मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड सारख्या फलंदाजांना त्रास दिला अशी माहिती क्रिकेट. कॉम. एयू ने दिली. दरम्यान जगातील कोणताही फिरकीपटू अश्विनच्या गोलंदाजीशी बरोबरी करू शकत नाही, पण पिथिया ऑस्ट्रेलियन संघाला मदत करत आहे, जेणेकरून ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय स्पिनर्स गोलंदाजांशी व्यवस्थित खेळता येईल. 

कोण आहे महिश पिठिया?

21 वर्षीय फिरकीपटू महिश पिठिया (Mahesh Pithiya) हा गुजरातमधील जुनागढचा रहिवासी आहे. अश्विनसारखी हुबेहुब बॉलिंग करण्याची शैली आणि सोशल मीडियावरील फुटेज पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनाने पिथियाला त्यांच्या शिबिरात बोलावले आणि त्याला मालिकेसाठी तयार होण्यासाठी राजी केले होते. पिठिया हा अश्विनला आपला आदर्श मानतो. 

कारकिर्द

महिश पिठियाने (Mahesh Pithiya) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बडोद्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पिथियाने आतापर्यंत फक्त 4 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 7 डावात 8 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनप्रमाणेच पिथियामध्येही फलंदाजीत चमत्कार दाखवण्याची क्षमता आहे. अश्विनला भेटून टीम इंडियाकडून खेळण्याचे पिथियाचे स्वप्न आहे. चाहत्यांना लवकरच पिठिया आयपीएलमध्येही पाहता येणार आहे.

दरम्यान आता महिश पिठियाच्या (Mahesh Pithiya) नेट्समधील गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियाला किती फायदा होतो, हे सामन्या दरम्यानच कळणार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया भारतीय बॉलिंग अटॅकला कसे सामोरे जाते हे पाहावे लागणार आहे.  

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

9-13 फेब्रुवारी: पहिली कसोटी, नागपूर
17-21फेब्रुवारी: दुसरी कसोटी, दिल्ली
1-5 मार्च: तिसरी कसोटी, धर्मशाला
9-13 मार्च: चौथी कसोटी, अहमदाबाद

टीम इंडियाचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि सूर्यकुमार यादव