फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला राहुल द्रविडचा महत्वाचा सल्ला

टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा सध्या फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळेच त्याला प्रयत्न करूनही टीम इंडियात जागा मिळणे कठिण होत आहे. दिलीप ट्रॉफीमध्येही ॠषभ काही खास करिश्मा दाखवू शकला नाही.

Updated: Sep 27, 2017, 06:59 PM IST
फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला राहुल द्रविडचा महत्वाचा सल्ला title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत हा सध्या फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळेच त्याला प्रयत्न करूनही टीम इंडियात जागा मिळणे कठिण होत आहे. दिलीप ट्रॉफीमध्येही ॠषभ काही खास करिश्मा दाखवू शकला नाही.

अशात ॠषभला भारतीय अंडर-१९ आणि इंडिया-ए टीमचा कोच राहुल द्रविडने एक महत्वाचा सल्ला दिलाय.   

राहुल द्रविड म्हणाला की, पंतने प्रत्येकवेळी आक्रामक होऊन खेळण्याबाबत विचार करू नये. त्याने परिस्थीतीनुसार खेळण्याचा प्रयत्न करावा. ॠषभ हा वेळेनुसार वेगवेगळ्या परिस्थीतीत खेळणे शिकेल. पण त्यासाठी त्याला थोडा वेळ लागेल. 

यासोबतच राहुल द्रविडने पंतचं कौतुकही केलं आहे. तो म्हणाला की, ‘पंत हा तसा आक्रमक खेळाडू बॅट्समन आहे. तो नेहमीच तसाच राहणार. पण हेही महत्वाचं आहे की, त्याने परिस्थीतीनुसार खेळ करावा’.