भाई, ये किस लाईन मे आ गये...; Rahul Dravid चा हा हटके अवतार पाहिला का?

राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखालील टीम वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. 

Updated: Jul 20, 2022, 08:03 AM IST
भाई, ये किस लाईन मे आ गये...; Rahul Dravid चा हा हटके अवतार पाहिला का? title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकून टीम इंडिया वेस्ट इंडिजला पोहोचली आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखालील टीम वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. आगामी T20 वर्ल्डकप पाहता हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वनडे मालिकेसाठी बऱ्याच खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीये. त्यामुळे शिखर धवन टीमचं नेतृत्व करणार आहे.

धवन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असतो. त्याचे इंस्टाग्रामवरचे रील्सही खूप व्हायरल होतात. आता वेस्ट इंडिज दौऱ्यात, धवनने त्याच्या सहकाऱ्यांना सामील करून एक मजेदार इंस्टा-रील बनवलंय.

मुख्य म्हणजे या रीलमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील इतर खेळाडूंप्रमाणेच हटके मूडमध्ये दिसतायत. द्रविड सोशल मीडियापासून दूर असतो. मात्र आता त्याने इतर खेळाडूंप्रमाणे इन्स्टा रीलमध्येही पदार्पण केलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

दरम्यान टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडला इन्स्टा रील्समध्ये पाहून चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का बसला आहे. यावरून अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. यामध्ये एका मीम पोस्टमध्ये, राहुल सर, हे कोणत्या लाईनमध्ये आलात तुम्ही, असं म्हणत मजा घेण्यात आली आहे. 

पहिला सामना 22 जुलै रोजी होणार आहे

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 22 जुलैला, दुसरा सामना 24 जुलैला आणि तिसरा सामना 27 जुलैला खेळवला जाणार आहे. वनडे सिरीजमधील तिन्ही सामने त्रिनिदादमध्ये खेळवले जातील. यानंतर 29 जुलैपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे.