Team India World Cup: भारताने 2013 पासून एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी होणारा टी 20 वर्ल्डकप भारत जिंकेल, अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. 2014 पासून विराट कोहलीची कारकिर्द सुरु झाली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत संघाने एकही मोठा किताब जिंकलेला नाही. त्यानंतर विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदानंतर भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. मात्र आता भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या संघात असतो. तर तीन वर्ल्डकप जिंकले असतो. श्रीसंतने 2015, 2019 आणि 2021 या वर्ल्डकपचा उल्लेख केला आहे. श्रीसंत टी 20 वर्ल्डकप 2007 आणि एकदिवसीय 2011 वर्ल्डकप संघातील सदस्य होता.
मॅच फिक्सिंगमुळे या प्रतिभावान गोलंदाजाच्या कारकीर्दीला खिळ बसली. मात्र, श्रीसंतने हार मानली नाही. सर्व आरोपातून मुक्त होऊन मैदानात परतला. त्याने रणजीसह केरळसाठी काही सामने खेळले. आयपीएलमधील लिलावासाठीही त्याने आपले नाव पाठवले होते पण त्याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. या वर्षी त्याने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आणि निवृत्तीची घोषणा केली आहे.
39 वर्षीय एस. श्रीसंत भारतीय संघासाठी 29 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. श्रीसंतच्या नावावर एकूण 87 कसोटी विकेट्स, 75 एकदिवसीय विकेट्स आणि 7 टी-20 विकेट्स आहेत.