SRH vs RR: संजू सॅमसनमुळे वाढणार राजस्थानच्या अडचणी; क्वालिफायर सामन्यापूर्वीच वाईट बातमी!

IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं. 

सुरभि जगदीश | Updated: May 24, 2024, 06:57 AM IST
SRH vs RR: संजू सॅमसनमुळे वाढणार राजस्थानच्या अडचणी; क्वालिफायर सामन्यापूर्वीच वाईट बातमी! title=

IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: आयपीएलचा 17 वा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या सिझनमधील दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवण्यात येणार आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना रंगणार आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र अशातच राजस्थानच्या टीमसाठी मोठी बातमी आहे. दुसऱ्या क्वालिफायरपूर्वी राजस्थानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाही

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं. 

कशी होती संजूची कामगिरी

एलिमिनेटर सामन्यात संजू काही विशेष करू शकला नाही. यावेळी 13 बॉल्समध्ये 17 रन्स करून तो आऊट झाला होता. मात्र अखेरीस राजस्थानने या सामन्यात विजय मिळवला. पण आता राजस्थानसाठी वाईट बातमी म्हणजे संजू पूर्णपणे फीट नाही. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजूच्या फीटनेसमुळे राजस्थानच्या अडचणी वाढल्या आहेत. सॅमसनच्या म्हणण्यानुसार, त्याला काहीसा सौम्य खोकला होता. दुसऱ्या क्वालिफायरसाठी राजस्थानची टीम हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

राजस्थान टीमच्या अडचणीत वाढ

अशा परिस्थितीत हैदराबादविरुद्ध विजय मिळवणं राजस्थानसाठी सोपं नसणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यात टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्माने यंदाच्या सिझनमध्ये तुफानी फलंदाजी केली. जर अभिषेकचा फॉर्म कायम राहिला तर क्वालिफायरमध्ये राजस्थानच्या अडचणी वाढू शकतात. ट्रॅव्हिस हेडनेही हैदराबादसाठी चांगली कामगिरी केली आहे. ते राजस्थानमधील तणावही वाढवू शकतात.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स ( कर्णधार ), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन ( कर्णधार आणि विकेटकीपर ), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.