Dil Jashn Bole, Ranveer Singh : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपला (CWC 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहे. यंदाचा वर्ल्ड कप येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळवला जाणार आहे. अशातच आता वर्ल्ड कपमध्ये थेट बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याची एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. आयसीसीने (ICC) एक पोस्ट करून याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. रणवीर सिंह नेमका वर्ल्ड कपमध्ये काय करणार आहे? असा सवाल सर्वांनाच पडला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये रणवीर सिंह दिसतोय. उद्या दुपारी 12 वाजता वर्ल्ड कपचं अँथम सॉग रिलीज होणार आहे. त्याची झलक आयसीसीने ट्विट करत दाखवली आहे. दिल जश्न बोलो.., असं या गाण्याचं नाव आहे. यामध्ये रणवीर डोक्यावर हॅट घालून नाचताना दिसतोय. डोळ्यांवर गॉगल अन् निळ्या ड्रेसमध्ये रणवीर दिसत आहे.
DIL JASHN BOLE! #CWC23
Official Anthem arriving now on platform 2023
Board the One Day Xpress and join the greatest cricket Jashn ever!
Credits:
Music - Pritam
Lyrics - Shloke Lal, Saaveri Verma
Singers - Pritam, Nakash Aziz, Sreerama Chandra, Amit Mishra, Jonita… pic.twitter.com/09AK5B8STG— ICC (@ICC) September 20, 2023
The greatest cricketing Jashn is almost here, 12pm IST tomorrow! #CWC23 pic.twitter.com/vqAURnVWlV
— ICC (@ICC) September 19, 2023
रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला आहे. सुपरस्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) या सिनेमाचा भाग असेल. तर बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) देखील यामध्ये असणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता रणवीर सिंग वर्ल्ड कपसाठी सर्वांमध्ये जोश जागवताना दिसतोय.
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी यादव. , मोहम्मद सिराज.
दरम्यान, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिल्या दोन सामन्यात संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. तिसरा सामना भारतासाठी सराव सामन्यासारखा असणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सामन्यात असणार आहे.