रवी शास्त्रीचीच यो-यो टेस्ट करा! सोशल मीडियावर ट्रोल

भारतीय टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.

Updated: Aug 9, 2018, 05:40 PM IST
रवी शास्त्रीचीच यो-यो टेस्ट करा! सोशल मीडियावर ट्रोल title=

लंडन : भारतीय टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी-२० सीरिजमध्ये विजय झाल्यानंतर वनडे सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला. यानंतर सुरु झालेल्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये कर्णधार विराट कोहली वगळता कोणत्याही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नाही. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रन केल्या होत्या. पण विराटला दुसऱ्या बॅट्समननी साथ न दिल्यामुळे भारताचा फक्त ३१ रननी पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय बॅटिंगवर जोरदार टीका होत आहे. भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्री हा देखील सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे.

रवी शास्त्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रवी शास्त्रीचं पोट दिसत असल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. रवी शास्त्रीलाच यो-यो टेस्टमध्ये पास होण्याची गरज आहे. यासारख्या मजेशीर कमेंट यूजरनी ट्विटरवर टाकल्या आहेत. दुसऱ्या टेस्ट मॅचआधी लॉर्ड्सच्या खेळपट्टीची पाहणी करतानाचा रवी शास्त्रीचा फोटो बीसीसीआयनं ट्विट केला आहे. या फोटोवरूनच रवी शास्त्रीला ट्विटरवर चिमटे काढण्यात आले.