वर्ल्ड कप विनर कॅप्टनकडून अश्विनला पत्र, 'माझा रेकॉर्ड....'

माजी कर्णधाराकडून आर अश्विनला पत्र, पाहा काय म्हटलंय पत्रामध्ये....

Updated: Mar 17, 2022, 05:44 PM IST
वर्ल्ड कप विनर कॅप्टनकडून अश्विनला पत्र, 'माझा रेकॉर्ड....' title=

मुंबई : आर अश्विननं श्रीलंका विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला आहे. कपिल देव यांचा कसोटी मालिकेचील 434 विकेट्सचा विक्रम मोडल्यानंतर आर अश्विनचं जगभरात कौतुक होत आहे. 

आता आर अश्विनचं पुढचं लक्ष्य अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड असणार आहे. बंगळुरूमध्ये दुसऱ्या कसोटीदरम्यान अश्विनने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेन स्टेनचा 439 कसोटी बळींचा विक्रमही मोडला.

एकाच वेळी दोन विक्रम मोडीत काढणारा अश्विन भारतातील दुसरा बॉलर ठरला आहे. त्याच्या या कामगिरीचं कौतुक माजी कर्णधार कपिल देव यांनी केलं आहे. कपिल देव यांनी पुष्पगुछ देऊन पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी अश्विनचं कौतुक केलं आहे. 

'अश्विन अभिनंदन! तू माझा विक्रम मोडलास याचा खरोखर आनंद झाला. तू पुन्हा एकदा गौरवानं मान उचं केलीस! तुला आणि कुटुंबातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा', असं या पत्रामध्ये कपिल देव यांनी लिहिलं आहे. 

मला खूप आनंद झाला त्यांनी माझं कौतुक केलं याचा मला खूप आनंद झाला असंही यावेळी आर अश्विन म्हणाला आहे. 28 वर्षांपूर्वी मी माझ्या वडिलांसोबत कपिल यांनी मोडलेला रेकॉर्ड पाहून त्यांचा नावाचा जयघोष करत होतो. आज त्यांनी मला पत्र लिहून माझं कौतुक केलं आहे. याचा खरंच आनंद आहे. 

आर अश्विननं नुकताच कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात त्याने सर्वाधिक विकेट्स घेत विक्रम मोडला आहे. एकाचवेळी चार खेळाडूंना मागे टाकून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. आर अश्विनच्या नावावर 442 विकेट्स आहेत. 

आता आर अश्विनचं पुढचं लक्ष्य अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडण्याकडे असणार आहे. सुनील गावस्कर यांनी अश्विनबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. 35 वर्षांचा अश्विन सध्या भारतीय कसोटी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर लेग स्पिनर अनिल कुंबळे आहेत.