RCB vs KKR : चिन्नस्वामी स्टेडियमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये कोलकात्याच्या टीमने बंगळूरूवर विजय मिळवला आहे. रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा हा चौथा पराभव होता. तर कोलकाता नाईट रायडर्सचा हा तिसरा विजय होता. कोलकात्याकडून वरूण चक्रवर्तीने (Varun Chakaravarthy) 3 विकेट्स काढल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 201 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 200 रन्स केले. जेसन रॉय आणि नारायण जगदीशन यांनी पहिल्या विकेटसाठी 83 रन्सची पार्टनरशिप केली केली. तर रॉयने या सिझनमधील सलग दुसरं अर्धशतक झळकालंय. जगदीशन आणि जेसनने 29 बॉल्समध्ये 56 रन्सची खेळी केली.
आजच्या सामन्यात कर्णधार नितीश राणा यानेही उत्तम खेळी केली. राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 80 रन्सची पार्टनरशिप केली. राणाने 21 बॉल्समध्ये तीन फोर आणि चार सिक्सच्या मदतीने 48 रन्सची खेळी केली. तर व्यंकटेशने 31 रन्सची खेळी केली. बंगळुरूकडून वनिंदू हसरंगा आणि वैशाकने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. तर सिराजला एक विकेट मिळाली.
201 रन्सच्या टागरेटचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये फाफ बाद झाला आणि त्यानंतर सामन्याचं संपूर्ण चित्र पालटलं. फाफ नंतर आलेला शाहबाज अहमद पुन्हा एकदा अपयशी ठरला. यावेळी एका बाजून विराट कोहलीने फटकेबाजी सुरु ठेवली होती.
विराट कोहली आणि महिपाल लोमररने यांनी मिळून चांगली खेळी केली. दोघांनी 55 रन्सची पार्टनरशिप केली. यामध्ये विराट कोहलीने आजच्या सामन्यात देखील अर्धशतक झळकावलं. विराटने 37 बॉल्समध्ये 54 रन्सची खेळी केली. मात्र त्याला सामना जिंकवून देता आला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू: विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, वानिंदु हसरंगा, डेविड विली
कोलकाता नाईट रायडर्स: एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कर्णधार), वैभव अरोड़ा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेविड वीज