Rishabh Pant :ऋषभ पंतची नवीन हेल्थ अपडेट आली समोर, स्वत:च दिली माहिती

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हेल्थ अपडेटबाबत नवनवीन माहिती समोर येत असते. यामध्ये त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती आहे. आता अशीच नवीन हेल्थ अपडेट समोर आली आहे. 

Updated: Feb 7, 2023, 09:08 PM IST
Rishabh Pant :ऋषभ पंतची नवीन हेल्थ अपडेट आली समोर, स्वत:च दिली माहिती

Rishabh Pant's Instagram Story: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपुर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant)याच्या फिटनेसबाबत माहिती समोर आली आहे. यामध्ये तो फिट असल्याचे समोर आले आहे. पंतने स्वत: सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे. 

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हेल्थ अपडेटबाबत नवनवीन माहिती समोर येत असते. यामध्ये त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती आहे. आता अशीच नवीन हेल्थ अपडेट समोर आली आहे. यामध्ये स्वत: ऋषभने त्याच्या हेल्थबाबत नवीव अपडेट दिली आहे. ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बाहेर बसून ताजी हवेचा आनंद लुटताना दिसत होता. या त्याच्या हेल्थ अपडेटने क्रिकेट फॅन्सना दिलासा मिळालाय.

पंतची इन्स्टाग्राम स्टोरी 

ऋषभ पंतने (Rishabh Pant)त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.या स्टोरीमध्ये त्याने लिहलेय की, "बाहेर बसून ताजी हवा श्वास घेण्यास सक्षम असणे इतके धन्य वाटेल हे कधीच माहित नव्हते. हा फोटो हॉस्पिटलच्या बालकनीतला दिसत आहे. या बालकनीच्या बाजूला काही इमारती दिसतायत. पंतने हि माहिती देऊन फॅन्सना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान ऋषभ पंतची प्रकृती ठिक होत चालली आहे. मात्र त्याला रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अपघाताचा घटनाक्रम

30 डिसेंबर 2022 रोजी पंत यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांना अनेक गंभीर दुखापत झाली होती. पंत यांची कार दिल्लीहून रुडकी येथील त्यांच्या घरी परतत असताना दुभाजकाला धडकली आणि अनेक वेळा उलटल्यानंतर काही अंतरावर थांबली. यानंतर त्यांच्या कारला आग लागली होती. या अपघातात तो भयंकर जखमी झाला होता. या अपघातानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये आठवडाभर उपचार घेतल्यानंतर एअरलिफ्टद्वारे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आणण्यात आले, तेथे त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो आता बरे होण्याच्या मार्गावर आहेत.

दरम्यान दुखापतीमुळे पंत बॉर्डर-गावस्कर (Border Gavaskar Trophy) मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. तो मैदानात कधी परतणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.मात्र आता त्याने दिलेल्या हेल्थ अपडेटने फॅन्सना दिलासा मिळाला आहे.