"येत्या 10 वर्षात 'हा' भारतीय खेळाडू टी-20 क्रिकेट गाजवणार"

कसोटीमध्येही या खेळाडूने एकट्याच्या जोरावर 'या' खेळाडूने भारताला सामने जिंकून दिले आहेत.

Updated: Nov 18, 2022, 05:49 PM IST
"येत्या 10 वर्षात 'हा' भारतीय खेळाडू टी-20 क्रिकेट गाजवणार" title=

Sport News : नुकताच टी-20 वर्ल्डकप पार पडला मात्र भारताला सेमी फायनल सामन्यामध्ये इंग्लंड संघाकडून मानहानिकारक पराभव पत्कारावा लागला होता. भारतीय संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना या वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र त्यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं नाही. वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिकमुळे पंतला खेळण्याची संधी मिळाली नाही. एक दोन सामन्यांमध्ये संधी भेटली परंतु पंतला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. अशातच पंतबाबत भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने मोठं वक्तव्य केलं आहे. (Rishabh Pant will dominate T20 cricket in the next 10 years says Robin Uthappa)

न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेमध्ये पंतने डावाची सुरुवात करावी. त्याने ओपनिंगला खेळलं पाहिजे. मला वाटतं की तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. पंत गेमचेंझर खेळाडू असून एकट्याच्या जोरावर भारताला सहज सामने जिंकून देऊ शकतो. येत्या 10 वर्षातील पंत सर्वात मोठा खेळाडू असणार असल्याचं भाकित रॉबिन उथप्पाने केलं आहे.

ऋषभ पंत हा न्यूझीलंड दौऱ्यावर संघाचा उपकर्णधार आहे, त्यामुळे त्याला प्रत्येक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. इशान किशन आणि संजू सॅमसन हे संघातील इतर यष्टीरक्षक पर्याय आहेत. परंतु हे दोन्ही खेळाडू पंत असताना केवळ फलंदाज म्हणून स्थान मिळवू शकतात. पंतसाठी संघात पुनरागमन करण्याची ही उत्तम संधी असणार आहे.

दरम्यान, ऋषभ पंतच्या फलंदाजीत सातत्य नसल्यामुळे त्याला अनेकदा संघाबाहेर राहावे लागले. ऋषभ पंतने 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या 22 T20 सामन्यांमध्ये 30 पेक्षा कमी सरासरीने 337 धावा केल्या आहेत.