एलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!

विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराजच्या शतकांच्या पावसाची मस्क यांनी घेतली दखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Updated: Dec 2, 2022, 06:46 PM IST
एलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!

Sport News : विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2022) महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा ( Ruturaj Gaikwad Final Vijay Hazare Trophy) डंका आहे. पठ्ठ्याने फायनलमध्येही शतक मारलं मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने सौराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. कर्णधार जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली विजय हजारे ट्रॉफी 2022 वर सौराष्ट्र संघाने आपलं नाव कोरलं आहे. फायनलमध्ये जरी पराभव झाला असला तरीसुद्धा ऋतुराजची देशभर क्रीडा वर्तुळात बोलबाला आहे. युवा खेळाडूचं ट्विट व्हायरलं झालं असून त्याने थेट एलोन मस्क यांना टॅग करत एक मजेशीर सवाल केला आहे. (Riyan Parag twit Ruturaj Gaikwad Elon Musk latest marathi sport news)
 
आयपीएलमधील युवा स्टार खेळाडू रियान परागने ट्विट (Riyan Parag twit) करत थेट एलोन मस्क यांना टॅग केलं आहे. एलॉन मस्क यांना कुणीतरी ऋतुराज गायकवाड मंगळावरून आला आहे का?, असं रियान परागने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रियानचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. त्यामुळे आता यावर मस्क काही प्रत्युत्तर देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजच्या अंतिम सामन्यातही ऋतुराज गायकवाडने 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत. या शतकी खेळीच्या बळावर महाष्ट्राने 9 विकेट गमावून 248 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे सौराष्ट्र समोर 249 धावांचे आव्हान होतं. 

महाराष्ट्राने (Maharashtra Cricket) दिलेल्या 248 आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या सौराष्ट्रची (Saurashtra) सुरुवात चांगली झाली नव्हती. सौराष्ट्रचा हार्विक देसाईचे अर्धशतक ठोकून आऊट झाला. यानंतर झटपट 3 विकेट पडले होते. त्यामुळे सौराष्ट्र बॅकफुटवर गेली होती. मात्र शेल्डन जॅक्सनने (sheldon jackson) एक बाजू धरली होती.आणि त्याने ही बाजू भक्कम करत सौराष्ट्रला विजय मिळवून दिला.