Rohit Sharma : चाहत्यांना ज्या साामन्याची उत्सुकता होती, तो सामना श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्यात रोहित शर्माने ( Rohit sharma ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा. मात्र हा निर्णय टीम इंडियाच्या ( Team India ) अंगलट आल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्मा ( Rohit sharma ) अवघ्या 11 रन्सवर माघारी परतला. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पाकिस्तानविरूद्धचा सामना काही काळ पावसामुळे थांबवण्यात आला होता. यावेळी रोहित शर्मा ( Rohit sharma ) फलंदाजी करत असताना फखर जमनच्या एका चुकीमुळे रोहित शर्माला ( Rohit sharma ) जीवदान मिळालं. मात्र यावेळी पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने ( Babar Azam ) अपशब्द वापरल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहते मात्र बाबरवर टीका करताना दिसतायत.
आशिया कप 2023 चा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जातोय. टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्माने ( Rohit sharma ) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला उतरल्यानंतर ही घटना घडली. रोहित शर्मा पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बाद होण्यापासून थोडक्यात बचावला.
यावेळी झालं असं की, या ओव्हरमध्ये शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी करायला आला. दुसऱ्या बॉलवर त्याने रोहित शर्माचा सामना केला. बॉलचा वेग 137kph होता, त्यावर हिटमॅनने फोर मारला. बॉल पॅडवर आला आणि रोहितने तो वरच्या बाजूने फ्लिक केला. त्याचवेळी स्क्वेअर लेगच्या फिल्डरने तो कॅच करण्याचा प्रयत्न केला.
Rohit pic.twitter.com/QWErbgXM75
— Pappu Plumber (@tappumessi) September 2, 2023
मात्र यावेळी रोहितचा हा कॅच सुटला आणि पाकिस्तानने एक मोठी संधी गमावली. फिल्डरच्या या चुकीने कर्णधार बाबर आझमसह ( Babar Azam ) गोलंदाज शाहीन आफ्रिदीला राग आला. त्याने फिल्डरला शिवीगाळ केल्याचा दावा व्हायरल व्हिडीओवरून करण्यात येतोय.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती व्हायरल व्हिडीओवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास याला दुजोरा देत नाही. )