रोहित शर्माच्या तब्येतीवर द्रविडचं सर्वांत मोठ विधान

 टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो आयसोलेशनमध्ये आहे.

Updated: Jun 29, 2022, 10:07 PM IST
रोहित शर्माच्या तब्येतीवर द्रविडचं सर्वांत मोठ विधान title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो आयसोलेशनमध्ये आहे.तो कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याच्या व त्याच्या जागी संघाचे नेतृत्व बुमराह करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्य़ात आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केले आहे. यामुळे रोहितच्या मैदानात वापसीची चर्चा सुरु झालीय.  

एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटीतून रोहितला वगळण्यात आल्याच्या बातम्य़ा प्रसिद्ध झाल्या होत्य़ा. त्याचवेळी त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र द्रविडने हे सर्व वृत्त फेटाळून लावले आहेत. 

 राहुल द्रविड पत्रकार परिषदेत म्हणाला, “आमच्या वैद्यकीय पथकाकडून रोहित शर्मावर लक्ष ठेवले जात आहे. तो कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला नाही. त्याची आरटी पीसीआर चाचणी आज आणि नंतर उद्या केली जाईल. आमच्याकडे खेळण्यासाठी ३६ तास आहेत, अजून वेळ आहे.

 द्रविडच्या या विधानानंतर रोहितची मैदान वापसी होऊ शकते अशी आशा आहे. म्हणजे जर त्याच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या तर तो मैदानात परतण्याची शक्यता आहे.  

रोहित शर्मा कोविड 19 पॉझिटिव्ह असून तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे. टीम इंडियाने आज एजबॅस्टन येथे सरावाला सुरुवात केली, मात्र रोहित सराव सामन्यात दिसला नव्हता.याचाच अर्थ अद्याप तो कोविडमधून बरा झाला नाही आहे. 

कोरोना विषाणूमुळे 2021 मध्ये ही कसोटी मालिका रद्द करण्यात आली होती. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.