Rohit Sharma च्या विकेटमुळं पुन्हा वादंग, आयसीसीचा नियम काय सांगतो?

Rohit Sharma : आरसीबी विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या विकेटवरून वादंग माजल्याचं दिसून येतंय. रोहित शर्मा खरंच आऊट होता का यावर प्रश्न उपस्थित केलं जातंय. रोहित या सामन्यात अवघ्या 7 रन्सवर माघारी परतला. 

Updated: May 10, 2023, 04:20 PM IST
Rohit Sharma च्या विकेटमुळं पुन्हा वादंग, आयसीसीचा नियम काय सांगतो? title=

Rohit Sharma : मंगळवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या खेळीसमोर आरसीबीच्या गोलदाजांनी गुडघे टेकले. हा सामना मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) 6 विकेट्सने जिंकला खरा, मात्र यावेळी रोहित शर्माच्या विकेटवरून पुन्हा वादंग माजल्याचं दिसून आलं. चाहत्यांनी कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) विकेटवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

रोहित शर्माच्या विकेटवरून झाला वाद

शनिवारी वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने प्रथम फलंदाजी करत 199 रन्स केले. 200 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना रोहित शर्मा शर्मा ओपनिंगला आला आणि अवघ्या 7 रन्सवर माघारी परतला. यावेळी रोहितला पुन्हा एकदा खराब फॉर्ममुळे ट्रोल करण्यात आलं. मात्र यावेळी रोहित शर्माच्या विकेटवरून वाद होताना दिसतोय. मात्र आता रोहित शर्मा खरंच आऊट होता का यावर खरंच प्रश्न चिन्ह उपस्थित होतंय. 

रोहित शर्मा फलंदाजी करत असताना वानिंदु हसरंगाचा बॉल त्याच्या पॅडवर जाऊन लागला. यावेळी अंपायरने त्याला आऊट करार दिला नाही. यानंतर आरसीबीने डीआरएस घेतल्यानंतर थर्ड अंपायरने रोहितला आऊट दिलं. दरम्यान आपल्याला आऊट दिल्यानंतर रोहित शर्माला देखील धक्का बसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. 

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आरसीबीविरूद्धच्या सामन्यात रोहित फलंदाजी करत असताना तो आणि स्टंप याच्यामध्ये 3 मीटरचं अंतर होतं. दरम्यान आयसीसीच्या LBW नियमांनुसार, ज्यावेळी बॉल पॅडवर आदळतो आणि टप्पा पडून स्टंपपर्यंत पोहोचतो त्यावेळी जर 3 मीटरचं अंतर असेल तर फलंदाज नाबाद असतो. त्यामुळे यानुसार, रोहित शर्मा नॉट आऊट होता, असं म्हटलं जातंय. 

माजी खेळाडूंनी फटकारलं

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद कैफने यावेळी डीआरएस सिस्टमला जबाबदार धरलंय. कैफच्या म्हणण्यानुसार, हेल्लो डीआरएस हे थोडं जास्त झालं असं नाही का वाटत? तर दुसरीकडे पूर्व गोलंदाज मुनाफ फटेल याने, रोहित शर्माला अनलकी म्हटलंय. मुनाफच्या म्हणण्यानुसार, डीआरएसच्या निर्णयावरही आता डीआएरस व्हायला पाहिजे.

मुंबईकडून आरसीबीचा धुव्वा

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 199 रन्स केले होते. 200 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 16.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं. या विजयाचा खरा हिरो ठरलेल्या सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी करत हा सामना आरसीबीच्या खिशातून काढून घेतला. सूर्याने तुफानी फलंदाजी करत 34 बॉल्समध्ये 83 रन्स केले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईला विजय मिळवणं शक्य झालं.