रोहितचा फ्लॉप शो, चार मॅचमध्ये तिसऱ्यांदा रबाडानं केलं आऊट

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो अजूनही सुरूच आहे. 

Updated: Feb 10, 2018, 11:23 PM IST
रोहितचा फ्लॉप शो, चार मॅचमध्ये तिसऱ्यांदा रबाडानं केलं आऊट  title=

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो अजूनही सुरूच आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावणाऱ्या रोहितचं दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातली कामगिरी खराब आहे. रोहितनं दक्षिण आफ्रिकेमध्ये ११ वनडे इनिंग खेळल्या. यातल्या एकाही मॅचमध्ये रोहितला अर्धशतकही करता आलं नाही. मागच्या ११ वनडेमध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोअर २३ रन्स आहे. तिसऱ्या वनडेमध्ये शून्य रनवर आऊट झालेला रोहित चौथ्या वनडेमध्ये ५ रन्सवर आऊट झाला.

चौथ्या मॅचमध्ये कागिसो रबाडानं रोहित शर्माला आऊट केलं. या सीरिजमध्ये रबाडानं रोहितची तिसऱ्यांदा विकेट घेतली. तर एका मॅचमध्ये मॉर्नी मॉर्कलनं रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

वनडे कारकिर्दीमध्ये रोहित शर्मा १२वेळा शून्यवर आऊट झाला आहे. याआधी ज्या ११ मॅचमध्ये तो शून्यवर आऊट झाला त्यापैकी ५ मॅचमध्ये भारताचा विजय तर ५ मॅचमध्ये पराभव झाला. एका मॅचचा निकाल लागला नाही.

रोहितनं मागच्या ११ इनिंगमध्ये ११.४५च्या सरासरीनं १२६ रन्स बनवले आहेत. या ११ इनिंगमध्ये रोहितचा स्कोअर ११, ९, २३, १, ५, १८, १९, २०, १५, ०, ५ असा आहे. पुन्हा एकदा लवकर आऊट झाल्यामुळे रोहित शर्मावर सोशल नेटवर्किंगवरून टीका होत आहे.