SRH vs RR: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 4 था सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) हा सामना खेळवला जातोय. या सामन्यात प्रथम टॉस जिंकत कॅप्टन भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (SRH vs RR Live Scores Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals IPL 2023 4th Match latest sports news)
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामासाठी एडन मार्करामची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. पण तो नेदरलँड्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत व्यस्त आहे, त्यामुळे या सामन्यात भुवनेश्वर कुमार टीमची जबाबदारी सांभाळत आहे.
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
The line-ups are in for @SunRisers & @rajasthanroyals!
What do you make of these two sides
Follow the match https://t.co/khh5OBILWy#TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/d9AVY0wthY
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (WC), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार (C), उमरान मलिक, टी नटराजन, फजलहक फारुकी.
नवीन नियमांसह हे नवीन आयपीएलमध्ये (IPL 2023) आहे. आपल्याला प्रतिस्पर्ध्यांचा आदर करावा लागेल आणि आपल्या ताकदीनुसार खेळावं लागेल. जयपूरमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असलेली ही जर्सी घालायला नेहमीच छान वाटते, असं संजू म्हणाला आहे.