नवी दिल्ली : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा आता कधीही याप्रकारे रन आऊट होणार नाही. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि श्रीलंका दौ-यात रोहित शर्मा दोनदा रन आऊट झाला होता.
पण तो दिवस जर १ ऑक्टोबर असता तर रोहित शर्मा आऊट होऊनही नॉट आऊट राहिला असता. याचं कारण म्हणजे आयसीसीचे नवे नियम. लवकरच क्रिकेटमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. यात बॅटचा आकार, चुकीचा व्यवहार केल्यास खेळाडूला बाहेर पाठवणे आणि डिसिजन रिव्ह्यू सिस्टममध्ये महत्वाचे बदल होणार आहेत.
या नव्या नियमांमध्ये एक नियम रन आऊट होणा-या खेळाडूंसाठी दिलासादायक आहे. टीम इंडियाचा खेळाडू रोहित शर्मा याच्या चेह-यावर हा नियम पाहिल्यावर नक्कीच हसू फुलले असेल. कारण रन आऊटबाबत करण्यात आलेला हा नवा नियम आधी असता तर रोहित दोनदा आऊट नसता झाला.
रनआऊट संदर्भातील नव्या नियमानुसार, कोणताही बॅट्समन डाईव्ह करताना वेळेत पोपिंग क्रिजपर्यंत पोहोचला असेल, तसेच तो बॅट पोपिंग क्रिजपर्यंत घेऊन गेला असेल. आणि अशात पोपिंग क्रिजशी आलेला त्यांचा संपर्क तुटला तर त्याला रनआऊट दिलं जाणार नाही.
BYJU Classes needs to pay Rohit Sharma @ImRo45 a helluva lot of money.
Free publicity. #IndvsSL #RohitSharma pic.twitter.com/59BNvdNmOi
— HumanAfterAll (@BruvPeace) August 20, 2017
श्रीलंका विरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा ४ रन काढून रनआऊट झाला होता. पिचवर धावताना रोहितची बॅट क्रिजच्या बाहेरच पडली होती आणि तो क्रिजमध्ये होता. पण त्याचे दोन्ही पाय हवेत होते. त्यामुळे तो आऊट झाला होता.