IND vs AUS: 19 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाने (Team India) दिल्लीत खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयासह भारताने सिरीजमध्ये अभेद्य आघाडी घेतलीये. ही टेस्ट सिरीज संपल्यानंतर दोन्ही टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आल्यानुसार, केवळ पहिल्या सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थितीत असणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी टीमच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्माच टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या वनडेसाठी उपस्थित राहू शकणार नाही. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सिरीजमध्ये उत्तम खेळ करत शतक झळकावलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला त्याची उणीव भासू शकते.
India’s ODI squad vs Australia
Rohit Sharma (C), S Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul, Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), R Jadeja, Kuldeep Yadav, W Sundar, Y Chahal, Mohd Shami, Mohd Siraj, Umran Malik, Shardul Thakur, Axar Patel, Jaydev Unadkat
— BCCI (@BCCI) February 19, 2023
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), आर जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेन्द्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.