मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना उद्या पाकिस्तानशी खेळणार आहे. टीम इंडियाची धुरा सध्या रोहित शर्माकडे असून यंदाचा वर्ल्डकप टीम इंडिया जिंकणार अशी अटकळ बांधण्यात येतेय. शिवाय सध्या रोहित शर्मा देखील उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतोय. मात्र जर रोहित शर्मा क्रिकेटर नसता तर तो कोण असता असा प्रश्न तुमच्या मनात आलाय का? जरी तुम्हाला हा प्रश्न पडला नसेल तरीही कर्णधार रोहित शर्माने याचं उत्तर दिलं आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये जर रोहित क्रिकेटर नसता तर काय बनला असता हे दाखवलंय.
या व्हिडीओची सुरुवात रोहित शर्माच्या मसाजने होताना दिसतेय. यामध्ये रोहित विचारतो की, जर मी क्रिकेटर नसतो तर... यानंतर रोहित शेफ बनला असल्याचं दिसतंय. शेफ म्हणून तो केक तयार करतो. रोहितने तयार केलेला केक फार वाईट बनतो. यावर रोहित बरं झालं मी माझं ड्रीम फॉलो केलं असं म्हणतोय.
Baker ya record breaker? Thank God I #dreambig @Dream11
.#Ad pic.twitter.com/AhJOOjwILV— Rohit Sharma (@ImRo45) October 21, 2022
टी20 वर्ल्ड कपच्या (t20 world cup) मोहिमेला सुरुवात होण्यापुर्वी रोहित शर्माने (Rohit sharma) पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने विविध मुद्यावर भाष्य केलं आहे. रोहित म्हणाला की, "गेल्या नऊ वर्षांत आम्ही एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही, त्यामुळे आमच्यासाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. तसेच ही स्पर्धा आम्हाला हा ट्रेंड बदलण्याची चांगली संधी देत आहे.
रोहित (Rohit sharma) पुढे म्हणतो, आम्हाला माहित आहे की आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे.त्यामुळे आम्ही एकावेळी एकच सामन्यावर लक्ष केंद्रीत करू. भारतासारख्या संघाकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात, पण आम्ही त्यांना निराश करणार नाही.